आषाढी एकादशीपासून (aashadhi ekadashi) पुढे श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अनेक सण आहेत. विशेष म्हणजे या सणांना उपवास आणि व्रताचे महत्त्व अधिक आहे. उद्या सगळीकडे आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात, या उपवासाच्या फराळाची मोठी जय्यत तयारी घरोघरी केली जाते. यंदा मात्र हा फराळ चांगलाचा महागला (inflation) आहे. फराळाच्या ताटातील मोठा मानकरी असलेल्या बटाट्याने गतवर्षाच्या तुलनेने यंदा 15 रुपयांवर भाव खाल्ला असून तो 35 ते 40 रुपये किलो इतका महागला आहे. प्रती किलो दराने विकला जात आहे. गरिबांचे काजू म्हणून ओळखल्या जाणारा शेंगदाणा घाऊक बाजारत 10 ते 15 रुपयांनी स्वस्त झाला असला तरी किरकोळ बाजारात चक्क दुपट्टीने महागला आहे. साखर दहा ते पंधरा रुपयांनी महागली आहे. साबुदाणा खाल्ल्याशिवाय उपवासाचे समाधान होत नाही. हा साबूदाणाही गेल्या वर्षांच्या तुलनेत किरकोळ बाजारात किलोमागे 15 ते 20 रुपयांनी महागला आहे.
यासोबतच गॅससुद्धा महागल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपवासाचा फराळ बनविण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. इंधनदारवाढीमुळे एकंदरीतच सर्व गोष्टीचे भाव वाढले आहे. त्या तुलनेने सामान्यांची आवक मात्र तितकीच आहे.