मुंबई : हिंदू धर्मात गरुड पुराणाला महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. गरुड पुराणात (GarudPuran) भगवान विष्णू आणि त्यांचे आवडते वाहन गरुड देव यांच्यातील संभाषणाचे वर्णन आहे. यामध्ये भगवान विष्णू, जन्म-मृत्यूचे चक्र, आत्म्याचा प्रवास तसेच यशस्वी आणि आनंदी जीवन प्राप्त करण्याबद्दलही सांगितले आहे. गरुड पुराणात सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्याने व्यक्तीला आरोग्य, संपत्ती आणि नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. यासाठी गरुड पुराणात सकाळच्या वेळेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशस्वी व्हायचे असल्यास या गोष्टीचे पालण अवश्य करावे.
गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने सकाळी नियमितपणे काही विशेष काम केले तर त्याच्या जीवनात महत्त्वाचे बदल येऊ शकतात. त्याचे झोपलेले नशीब जागे होऊ शकते. सकाळची वेळ खूप खास असते आणि त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण दिवस यशस्वी, आनंददायी आणि चांगला जातो.
रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाचे दर्शन घेऊन त्याची यथोचित पूजा करावी. यानंतर पितरांचा आशीर्वाद घ्या. गरुड पुराणानुसार जे लोकं आपल्या दिवसाची सुरुवात देव आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने करतात त्यांना जीवनात नेहमी यश मिळते.
स्वत: काहीही खाण्यापूर्वी दररोज देवाला नैवेद्य दाखवा. असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णासह सर्व देवी-देवता आपला आशीर्वाद देतात. असे घर नेहमी संपत्तीने भरलेले असते.
संधी मिळेल तेव्हा गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग धर्मादाय क्षेत्रात गुंतवा. अशा व्यक्तीला या जन्मातच सर्व सुख मिळत नाही तर मृत्यूनंतर स्वर्गही प्राप्त होतो. त्याच्या आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता नसते.
गरुड पुराणानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज आत्मनिरीक्षण केले पाहिजे. जेणेकरून त्याला त्याच्या योग्य आणि चुकीच्या निर्णयांमधील फरक समजेल आणि भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी त्याच्यामध्ये शहाणपण विकसित होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)