Akshaya Tritiya 2022 : सनातन धर्मात वैशाख महिन्याला खास महत्त्व आहे. यामहिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी वैशाख साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीया मंगळवार, ३ मे रोजी साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीया (Akshayya Tritiya) शुभ कार्य आणि खरेदीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीसोबतच धर्मादाय करण्याचेही खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते, असे म्हटले जाते. यावेळी दिवाळीप्रमाणेच (Diwali) अक्षय्य तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते. दुसरीकडे, ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही काम केल्याने माता लक्ष्मी (Mata Lakshmi) नाराज होते, त्यामुळे या दिवशी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जाणून घेऊया या दिवशी कोणते काम टाळावे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर गेला असाल तर रिकाम्या हाताने घरी परतणे शुभ मानले जात नाही. शक्य असल्यास, चांदी किंवा सोन्याचे काहीतरी घेऊन घरी जा. दुसरीकडे, जर महागडे दागिने खरेदी करणे शक्य नसेल, तर तुम्ही धातूपासून बनवलेली छोटी वस्तूही घरी आणू शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. या दिवशी दोन्हीची स्वतंत्रपणे पूजा केल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात. असे मानले जाते की लक्ष्मीसह विष्णूची पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे. दुसरीकडे, भगवान विष्णूची पूजा तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्यांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. परंतु अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंघोळ न करता अपवित्र अवस्थेत कोणी तुळशीला हात लावला किंवा स्पर्श केला तर भगवान विष्णू यांचा कोप होतो असे मानले जाते.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा शांत चित्ताने करावी. कारण शांततेने पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. याउलट जी व्यक्ती पूजेच्या वेळी विघ्न निर्माण करते किंवा रागवते, त्याला माता लक्ष्मीच्या रागाचा सामाना करावा लागू शकतो.
धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहू देऊ नका. घराच्या ज्या भागात अंधार आहे तिथे दिवा लावा, असे केल्याने तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील.