आपल्या संस्कृतीमध्ये अशा अनेक प्रथा असतात, ज्या ऐकण्यासाठी विचित्र वाटतात. मात्र समाजातील व्यक्ती त्या प्रथांचे वर्षानुवर्ष पालन करत आले आहेत. आपल्या घरातील जुणे-जानते व्यक्ती या प्रथांचे पालन करत आल्यामुळे आपण देखील पुढे या प्रथांचे पालन सुरूच ठेवतो. काही लोक या प्रथांना अंधश्रद्धा माणतात, मात्र वास्तूशास्त्रामध्ये (jyotish shastra) या प्रथांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. वास्तू शास्त्रात जशी घरांची रचना (Vastu tips for kitchen) सांगितली आहे, तशी घराची रचना करणे शुभ मानले जाते. वास्तू शास्त्रात तुमच्या किचनसंबंधित (Kitchen) देखील काही नियम सांगितले आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास अनेक संकटे येऊ शकतात असे देखील म्हटले आहे. यातीच एक प्रथा आहे ती म्हणजे गरम तव्यावर पाणी न टाकणे. तुम्ही जर गरम तव्यावर पाणी टाकत असाल तर वेळीच सावध व्हा असे वास्तूशास्त्र सांगते. गरम तव्यावर पाणी टाकल्यास अनेक संकटे येऊ शकतात. आज आपण या बद्दल जाणून घेणार आहोत.
माता लक्ष्मीची अवकृपा : मात लक्ष्मीला धनाची देवी माणण्यात येते. अशी माण्यता आहे की, किचनमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. प्राचीन काळापासून असे माणण्यात येते की, गरम तव्यावर पाणी टाकल्यास लक्ष्मीची अवकृपा होते. लक्ष्मी नाराज होते. लक्ष्मी नाराज झाल्यास कुंटुंबात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून दूर राहू इच्छित असाल तर चुकूनही गरम तव्यावर पाणी टाकू नका.
निगेटिव्हिटी : वास्तू शास्त्रात सांगितले आहे की, जर तुम्ही गरम तव्यावर पाणी टाकल्यास तुमच्या घरात काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात. या नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढल्यास तुमच्या घरातील पॉझिटिव्ह शक्ती हळूहळू कमी होते. तुम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
लग्नात अडथळे : तुम्ही जर अविवाहित आहात आणि तुम्ही गरम तव्यावर पाणी टाकत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण यामुळे तुमच्या लग्नात अडथळे निर्माण होऊन, तुमच्या लग्नाला विलंब होऊ शकतो असे वास्तूशास्त्र सांगते.
तव्याशी संबंधित इतर नियम : असे देखील मानण्यात येते की, स्वयपाक झाल्यानंतर तवा नेहमी पालथा ठेवावा, तसे न केल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.