Vastushastra : ‘वास्तूशास्त्रा’ नुसार, दुसऱ्याच्या ‘या’ गोष्टी चुकूनही वापरू नका, होऊ शकते मोठे नुकसान… !

| Updated on: Apr 24, 2022 | 4:59 PM

Vastushastra : वास्तूशास्त्रानुसार (According to Vastushastra) इतरांच्या वापरलेल्या काही गोष्टींचा वापर करून नकारात्मक ऊर्जा आपण आपल्याकडे ओढत असतो. या छोट्या गोष्टी तुमच्या मोठ्या नुकसानाचे कारण बनू शकतात. इतरांच्या कोणत्या गोष्टी आपण कधीही वापरू नयेत, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. काही गोष्टी इतरांच्या कधीही वापरू नयेत, असे तुम्ही वडिलधाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा ऐकले असेल. वास्तुशास्त्रातही असे […]

Vastushastra : ‘वास्तूशास्त्रा’ नुसार, दुसऱ्याच्या ‘या’ गोष्टी चुकूनही वापरू नका, होऊ शकते मोठे नुकसान... !
घड्याळ
Image Credit source: tv9
Follow us on

Vastushastra : वास्तूशास्त्रानुसार (According to Vastushastra) इतरांच्या वापरलेल्या काही गोष्टींचा वापर करून नकारात्मक ऊर्जा आपण आपल्याकडे ओढत असतो. या छोट्या गोष्टी तुमच्या मोठ्या नुकसानाचे कारण बनू शकतात. इतरांच्या कोणत्या गोष्टी आपण कधीही वापरू नयेत, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. काही गोष्टी इतरांच्या कधीही वापरू नयेत, असे तुम्ही वडिलधाऱ्या व्यक्तींकडून अनेकदा ऐकले असेल. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई आहे (It is forbidden). ‘वास्तू’ नुसार, इतरांच्या या गोष्टी वापरू नका, नुकसान होऊ शकते. अनेकांना इतरांकडून मागणी केलेल्या वस्तू घालण्याची किंवा वापरण्याची सवय असते. वास्तूनुसार ही सवय खूप वाईट (The habit is too bad) मानली जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जाणून घेऊया कोणत्या वस्तू आहेत, ज्या इतरांच्या वापरण्यास वास्तूशास्त्रात मनाई केली आहे.

घड्याळ

वास्तूनुसार कोणाचेही घड्याळ कधीही वापरू नये. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचे आयुष्य त्याच्या काळाशी संबंधित असते. जर एखाद्यावर वाईट वेळ येत असेल आणि तुम्ही त्याचे घड्याळ घातले तर ही वाईट वेळ तुमच्या आयुष्याशी जोडली जाईल.
कपडे – व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याद्वारे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा मिळवू शकता. यासोबतच हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे, कारण तुम्हाला इतरांच्या शरीरातून हानिकारक बॅक्टेरिया देखील मिळू शकतात.

शूज -चप्पल

व्यक्तीने कधीही इतरांचे शूज आणि चप्पल घालू नये. त्यामुळे घरात गरिबी येते. शनीचे स्थान पायांमध्ये मानले जाते. असे केल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या शनि दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो.

अंगठी

वास्तूनुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घालू नये. हे त्याच्यासाठी हानिकारक असू शकते. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य, आर्थिक आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रुमाल

वास्तुशास्त्रानुसार तुमचा रुमाल दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ ठेवल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो. त्याला लोकांमधील मारामारी आणि भांडणांशी जोडून पाहिले जाते.

उधार पैसे घ्या:

इतरांकडून कधीही पैसे घेऊ नका. वास्तूमध्ये सांगितले आहे की, पैशाचा कधीही दुरुपयोग करू नये. पैशाची मोठी गरज असेल तर पैसे उधार घ्या, ते लवकर परत केले पाहिजेत.

पेन

जेव्हा तुम्ही कोणाचे पेन घ्याल तेव्हा ते नक्कीच परत करा. वास्तूनुसार असे म्हटले जाते की, एखाद्याच्या पेनने काम केल्यानंतर ते लगेच परत केले पाहिजे. तसे न केल्यास पैशाचे नुकसान होते.

इतर बातम्या :

Vastu Tips | वास्तूनुसार इतरांच्या या गोष्टी अजिबात वापरू नका, मोठे नुकसान होऊ शकते!

24 April 2022 | 24 एप्रिल 2022, कसा जाईल रविवारचा दिवस, जाणून घ्या पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ड्रॉईंग रूममधील या चुकांमुळे होईल संपत्तीची हानी, चुका सुधारा नाहीतर पश्चाताप नक्की!