मुंबई : जर एखादी व्यक्ती झोपलेली असेल तर आपण त्याला उठवण्यात संकोच करतो (Acharya Chanakya), जेणेकरुन त्याला राग येऊ नये किंवा त्याला काही त्रास होऊ नये. परंतु कधीकधी काही लोकांना जागे करणे त्यांच्या हिताचे असते. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांना जागृत करण्यात अजिबात संकोच करु नये, कारण त्यांना जागं करण्यात त्यांचाच फायदा आहे. ते सहा लोक कोण आहेत ते जाणून घ्या (Acharya Chanakya Said Do Not Hesitate To Wake Up These 6 People Immediately In Chanakya Niti)-
विद्यार्थ्याचे आयुष्य संयमित असले पाहिजे. त्याच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या आहार आणि झोपेबद्दल सर्व काही एका निश्चित प्रमाणात हवं. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी 6 तास हा वेळ पुरेसा मानला जातो. जर तो जास्त झोपत असेल तर त्याला जागं करण्यात अजिबात संकोच करु नये.
दुकान, कारखाना किंवा घराचा चौकीदार तेथील जागेची सुरक्षा करण्यासाठी ठेवला जातो. अशा परिस्थितीत, जर तो कामादरम्यान झोपत असेल तर, त्याला उठविण्यास अजिबात संकोच करू नये. चौकीदार जर झोपी गेला तर त्या जागेवर चोरी वगैरेची भीती असते, तसेच या सवयीमुळे त्याची जबाबदारीदेखील काढून घेतली जाऊ शकते.
जर एखादी व्यक्ती झोपेत एखादे भयानक स्वप्न पाहून घाबरुन गेली असेल, तर तिला जागे करण्याच अजिबात संकोच करु नका. ताबडतोब तिला हलवून जागे करा आणि पाणी द्या. जेणेकरुन त्याचे स्वप्न भंग होईल आणि त्याला शांती मिळेल.
जर एखादा नोकर कामाच्या दरम्यान झोपी गेला असेल तर त्याला जागं केलं पाहिजे. अन्यथा त्याचे काम पूर्ण होणार नाही आणि यामुळे केवळ त्याच्यासाठी समस्या निर्माण होतील.
प्रवासादरम्यान एखादा प्रवासी झोपला असेल तर त्याला जागं करा. अन्यथा, कोणीही या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो आणि त्याचे सामान चोरु शकतो.
भुकेलेला व्यक्ती उपाशीच झोपला असेल तर त्याला जागं करावे आणि जोवायला द्यावे. असे केल्याने, त्याची भूक मिटेल, तसेच आपल्याला खूप चांगले वाटेल.
Chanakya Niti | ‘या’ चार परिस्थितीत चूक एकाची असते आणि भोगावं दुसऱ्याला लागतं…https://t.co/UkQMgVYq4s#ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2021
Acharya Chanakya Said Do Not Hesitate To Wake Up These 6 People Immediately In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | असे आई-वडील मुलांचे सर्वात मोठे शत्रू असतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात…