मुंबई : आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीति ग्रंथात (Acharya Chanakya) जीवनाच्या विविध पैलूंबाबत सांगण्यात आलं आहे. या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. नीति ग्रंथात लिहिलेल्या गोष्टींचे आयुष्यात अनुसरण केले तर त्या व्यक्तीला यश आणि प्रतिष्ठा मिळते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा चार प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्यावर विश्वास केल्याने व्यक्तीचा विश्वासघात हेऊ शकतो. चला अशा लोकांबद्दल जाणून घेऊया (Acharya Chanakya Warns To Do Not Trust These Four Types Of People In Chanakya Niti) –
आचार्य चाणक्य म्हणतात की अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ज्याच्याकडे शस्त्रे आहेत. या प्रकारची व्यक्ती रागाच्या भरात आपल्याला नुकसान पोहोचवू शकते. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे.
आचार्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या स्त्रीचे आचरण चांगले नाही अशा स्त्रीपासून दूर राहणेच बरे. या स्वभावाची स्त्री कधीही तुमचा विश्वासघात करु शकते. अशा महिलेवर विश्वास ठेवणे आपल्यासाठी धोकादायक ठरु शकते.
या प्रकारची व्यक्ती पटकन इतरांना त्यांच्या बोलण्यात गुंतवतात आणि वेळ येताच त्यांची फसवणूक करतात. अशा लोकांच्या गोड वागण्यामुळे लोक त्यांच्यावर लवकर विश्वास ठेवतात. ही त्यांच्यातील सर्वात मोठा गुण आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्याने राजघराण्यावर आणि उच्च पदावर बसलेल्या लोकांवर विश्वास ठेवू नये. या लोकांवर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक असू शकते. अशा लोकांशी मैत्री करु नका किंवा वैर करु नका. असे लोक आपल्या सामर्थ्याने आपल्याला हानी पोहोचवू शकतात.
Chanakya Niti | या सहा परिस्थिती होते खऱ्या मित्राची पारख, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात…https://t.co/Gn8jtP8TDq#ChanakyaNiti #AcharyaChanakya
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 29, 2021
Acharya Chanakya Warns To Do Not Trust These Four Types Of People In Chanakya Niti
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti : ‘या’ चार संकटात फसला असाल तर पळ काढण्यातच शहाणपण
Chanakya Niti | राजा आणि ब्राह्मणाइतकीच शक्तिशाली असते स्त्री, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात
Chanakya Niti | या चार व्यक्ती असतात पितृतुल्य, कधीही दुखवू नका, जाणून घ्या चौघांबद्दल