मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला पाळले जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी (Adhikmass Vinayak Chaturthi 2023) म्हणतात. या दिवशी गणपतीच्या पुजनाला विशेष महत्त्व आहे. शुक्रवार, 21 जुलै रोजी श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी साजरी होणार आहे. श्रावण महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी ही विशेष मानली जाते. त्याचे महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.
अधिक श्रावण महिन्यातील पहिली विनायक चतुर्थी 21 जुलै रोजी आहे. या दिवशी श्रावण आणि अधिक माससोबत रवियोग देखील तयार होत आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 21 जुलै रोजी सकाळी 06:58 वाजता सुरू होईल आणि 22 जुलै रोजी सकाळी 09:26 वाजता समाप्त होईल. पूजेचा मुहूर्त 21 जुलै रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 01:50 पर्यंत आहे. याशिवाय अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:27 ते 02:10 पर्यंत आहे. या मुहूर्तावर गणपतीची उपासना केल्याने खूप शुभ फळ मिळते.
श्रावण चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. यानंतर लाकडी चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्यानंतर पंचोपचार पद्धतीने गणपतीची पूजा करावी. गणपतीला शेंदूर, कुंकू, रोळी, अक्षत, पान, दुर्वा आणि मोदक अर्पण करा. यानंतर गणेश चालिसा आणि गणेश चतुर्थी व्रत कथा पठण करा. शेवटी विधिवत आरती करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)