Maha Shivratri 2022 | बेलाच्या पानावर महेश्वराची आराधना , 20 मिनिटांत साकारले डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र
महाशिवरात्रीच्या पार्शवभूमीवर विरारच्या कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर भगवान शिव भोलेनाथाचे चित्र साकारले आहे. अवघ्या 20 मिनिटात बेलाच्या पानावर रंग रंगोटी करत भोलेनाथाच्या चित्राला आकार दिला आहे.
1 / 5
हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.
2 / 5
महाशिवरात्रीच्या पार्शवभूमीवर विरारच्या कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर भगवान शिव भोलेनाथाचे चित्र साकारले आहे. अवघ्या 20 मिनिटात बेलाच्या पानावर रंग रंगोटी करत भोलेनाथाच्या चित्राला आकार दिला आहे.
3 / 5
बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. म्हणून चित्रकार कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर शिव साकारले.
4 / 5
कौशिक जाधव हे प्रत्येक वेळी नवनवीन विषयावर सुंदर कलाकृती करत असून महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानावर काढलेले शिव भोलेनाथाचे चित्र सर्वांचे आकर्षण बनले आहे.
5 / 5
महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते, तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे.बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते. या तीन पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते.