प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याचं पर्व सुरू आहे. महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभ मेळ्याचं पर्व असणार आहे. या कुंभमेळ्यात प्रमुख तिथींवर शाहीस्नान होणार आहे. यापैकी पौष पौर्णिमा आणि मकर संक्रातीचं शाही स्नान पार पडलं आहे. असं सर्व काही सुरळीत सुरु असताना मेळाव्यातील साधुसंतांबाबत आकर्षण आहे. नेमके कसे राहतात? कुठून येतात? वगैरे वगैरे.. या कुंभमेळ्यात सर्वाधिक कुतुहूल असतं ते अघोरी नागा साधूंबाबत.. अघोरी साधू म्हणजे वेगवेगळ्या विद्या आणि सिद्धी प्राप्त असलेले साधू म्हणून जनसामान्यांमध्ये ख्याती आहे. अघोरी हट्टी असातात. एखादी गोष्टी हवी असेल तर ती मिळवल्याशिवाय राहात नाहीत. अघोरी आपला राग शांत करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची ताकद ठेवतात. अघोरी साधुंचे डोळे कायम लाल दिसतात, त्यामुळे ते आक्रमक आहे असं वाटतं. पण ते मानसिकदृष्ट्या खूपच शांत असतात.
अघोरी कायम पुरुषाची कवटी आपल्यासोबत ठेवतात. माणसांचं मास खातात असं सांगितलं जातं. तसे धर्म संरक्षणासाठी कायम पुढे उभे असतात. अघोरी साधुंच्या जवळ जाण्यास तसं पाहिलं तर सामान्य लोकं घाबरतात. त्यांच्यासोबत असलेले शिष्यच त्यांची सेवा करतात. आघोरी भगवान शिवांना मानतात आणि आपलं जीवन त्यांच्यासाठी समर्पित करतात. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा अंतिम विधी कसा होतो? याबाबत कायम कुतुहूल असतं. अंत्यसंस्कार कोण करतं? आणि कसं होतं. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर.
अघोरी साधुचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव जाळलं जात नाही. अघोरी साधुच्या मृत्यूनंतर पायाची बैठक मारून शव उलटं टांगलं जातं. म्हणजेच डोकं खाली आणि पाय वरं असं. त्यानंतर सव्वा महिना म्हणजेच 40 दिवसांचा काळ पाळला जातो. या काळात पार्थिवावर किडे पडण्याची वाट पाहिली जाते. त्यानंतर शरीर काढलं जातं आणि अर्ध शरीर गंगा नदीत वाहिली जातं. तर डोक्याचा भाग साधना करण्यासाठी वापरला जातो. काही अघोरी डोक्याचा भाग साधनेनंतर आपल्याकडे ठेवतात. तर काही जणं ते गंगेत सोडून देतात. असं करण्यामागचं कारण असं की गंगेत त्याचे सर्व पापं धुवून जावीत.
अघोरी साधु माणसाचं मास खाण्यासही मागे पुढे पाहात नाहीत. पण गायीचं मास चुकूनही खात नाहीत. या व्यतिरिक्त इतर सर्व वस्तू खातात. अगदी माणसाच्या विष्ठेपासून ते मृत शरीराचं मास वगैरे खातात. अघोरी पंथात स्मशानात साधना करण्याचं महत्त्व आहे. त्यामुळे साधु स्मशानातच राहणं पसंत करतात. कारण स्मशानात साधना करणं शीघ्र फलदायी मानलं जातं.