Aja Ekadashi 2023 : आज श्रावण महिन्यातली अजा एकादशी, महत्त्व आणि पूजा विधी

| Updated on: Sep 10, 2023 | 11:21 AM

यावेळी आज 10 सप्टेंबर रोजी अजा एकादशी (Aja Ekadashi 2023) साजरी केली जात आहे. अजा एकादशीला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व मानले जाते.

Aja Ekadashi 2023 : आज श्रावण महिन्यातली अजा एकादशी, महत्त्व आणि पूजा विधी
एकादशी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि सर्व व्रतांपैकी एकादशी व्रत सर्वात मोठे मानले जाते. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर देखील सकारात्मक परिणाम होतो. यावेळी आज 10 सप्टेंबर रोजी अजा एकादशी (Aja Ekadashi 2023) साजरी केली जात आहे. अजा एकादशीला स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. ही एकादशी भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते.

अजा एकादशीचा महिमा

हिंदू कॅलेंडरनुसार, अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते. भगवान श्रीकृष्णाने आजा एकादशीची माहिती युधिष्ठिराला दिली होती. या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने मनुष्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.

अजा एकादशी शुभ मुहूर्त

एकादशी तिथी सुरू होते – 09 सप्टेंबर म्हणजेच उद्या संध्याकाळी  7:17 वाजता
एकादशी तिथी समाप्त – 10 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री 09:28 वाजता
अजा एकादशीचे पारण उद्या 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. ज्याची वेळ सकाळी 6.04 ते 8.33 अशी असेल.

हे सुद्धा वाचा

अजा एकादशीचा शुभ संयोग

यावर्षी अजा एकादशीच्या दिवशी दोन शुभ संयोग घडणार आहेत. ज्यामध्ये रविपुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. या दिवशी रविपुष्य योग 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:06 ते सकाळी 6:04 पर्यंत राहील. सर्वार्थ सिद्धी योग देखील 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:06 ते सकाळी 6:04 पर्यंत राहील.

अजा एकादशी पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि  कलश ठेवा. यानंतर भगवान विष्णूला फळे, पिवळी फुले, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करून आरती करावी. ओम अच्युते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा यासोबतच अजा एकादशीची व्रत कथा ऐका. यानंतर फलाहार करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजनदान करून आणि गरजू व्यक्तीला दान देऊन उपवास सोडता येतो.

अजा एकादशी खबरदारी

सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. या दिवशी घरामध्ये कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये. एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि शक्यतो भगवान विष्णूचे ध्यान करा. याशिवाय तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करू शकता. या दिवशी वादापासून दूर राहा.

भगवान विष्णूचा सर्वात प्रभावी मंत्र

अजा एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच शिवाय शरीर, मन आणि विचारांमध्ये शुद्धता येते. जर तुम्ही काही विशेष मंत्रांचा एकत्रितपणे जप केला तर अजा एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. ज्योतिषांच्या मते, अजा एकादशीच्या दिवशी, “उपेंद्राय नमः, ओम नमो नारायणाय मंगलम् भगवान विष्णू, मंगलम गरुध्वज. मंगलम् पुंडरीकाक्ष, मंगलय तनोहरिः।” या मंत्राचा जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)