मुंबई : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी कोणते मंगल कार्य, विवाह, खरेदी, गुंतवणूक आदींसाठी मुहूर्त पाहिला जात नाही. हिंदू धर्मात तप, व्रत, दान आणि तीर्थ याला विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती विधीवत व्रत ठेवून तप आणि दान-पुण्य करते त्या व्यक्तीस अक्षय पुण्य फलाची प्राप्ती होते. वैशाख महिन्यात या धार्मिक कार्यांना मोठे महत्त्व आहे. तर या महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या (akshay tritiya 2023) दिवशी केले जाणारे दान हे नेहमी अक्षय राहते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा अक्षय तृतीया 22 एप्रिलला आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी जल दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी किंवा लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. पुराणात असेही लिहिले आहे की, अक्षय्य तृतीयेला जल दान करणे फार मोठे पुण्य मानले जाते. असे केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते.
अक्षय तृतीयेला जवस दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. शास्त्रात जवस हे कनक म्हणजेच सोन्याच्या बरोबरीचे मानले जाते. त्यामुळे जव दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला तांदूळ, डाळ आणि पीठ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शुभ फळ मिळते. यासोबतच माता अन्नपूर्णाची कृपा सदैव राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)