मुंबई : देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेचा शुभ दिवस अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) 14 मे म्हणजेच आज आहे. मान्यता आहे की, या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली आणि द्वापारयुग संपले. त्याशिवाय, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी महर्षि जमदग्नी आणि देवी रेणुकेचा पुत्र म्हणूनही जन्माला आला. म्हणूनच अक्षय्य तृतीयेला परशुराम जयंतीही साजरी केली जाते (Akshaya Tritiya 2021 Do These Five Traditional Rituals For Good Luck And Prosperity).
या दिवशी अशा अनेक शुभ घटना घडल्यामुळे अक्षय्य तृतीयेटा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी केलेल्या कामाद्वारे मिळविलेले पुण्य कधीही कमी होत नाही. हेच कारण आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक दान करतात, सोने खरेदी करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच पाच कामे सांगणार आहोत जी अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जातात.
1. या दिवशी शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आणि गणेश यांची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही लोक उपवास ठेवतात. भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान हळद किंवा कुंकवाने रंगवलेल्या अक्षता अर्पण करा. मान्यता आहे की असे केल्याने आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते.
2. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि पितरांचं तर्पणही केले जाते. मान्यता आहे यामुळे व्यक्तीची पापातून मुक्तता होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात, घरात सुख आणि समृद्धी मिळते. आपण कोरोना काळात स्नासासाठी नदीवर जाऊ शकत नसल्यास घरात पाण्यात थोडं गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करा.
3. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी केलेल्या दानाचं बहुगुणित पुण्य प्राप्त होते. या दिवशी लोक पंखे, तांदूळ, साखर, भांडे, गूळ, पाण्याचं भांड इत्यादी दान करतात.
4. या दिवशी लोक सोन्याची खरेदी करतात. मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेलं सोनं पिढ्या न पिढ्या वाढत जातं आणि कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी नांदते.
5. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवाच्या नैवेद्याची एक विशेष ताट तयार केलं जातं, त्यात खीर, दही आणि मिठाई इत्यादी दूध आणि दुधाचे पदार्थ असतात. याशिवाय नारळ आणि अक्षता यांनी बनविलेले पदार्थही असतात.
Akshaya Tritiya 2021 | धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानला जातो अक्षय्य तृतीयेचा दिवस, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्वhttps://t.co/OtP2DQZpGE#AkshayaTritiya2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2021
Akshaya Tritiya 2021 Do These Five Traditional Rituals For Good Luck And Prosperity
संबंधित बातम्या :