हिंदू धर्मात एकादशी खूप खास मानली जाते. वर्षात २४ एकादशी असतात. प्रत्येक महिन्याला येणारी एकादशी ही जगाचे रक्षक भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित असते. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. हिंदू कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. आमलकी एकादशीच्या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान श्री हरि विष्णू यांची पूजा आणि उपवास विधीनुसार केले जातात. यादिवशी आवळ्याच्या झाडाला विशेष महत्व असते. तसेच या झाडाची पुजा देखील केली जाते.
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, जर आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने पूजा केली आणि उपवास केला तर भगवान नारायण प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देखील मिळतो. या दिवशी तुम्ही देखील आमलकी एकादशीचे उपवास आणि पूजा करतात, तेव्हा तुमची सर्व पापे नष्ट होतात. त्याचबरोबर तुमचे जीवन आनंदाने भरलेलं राहतं. व भगवान विष्णुच्या आशीर्वादाने घर नेहमी अन्न आणि संपत्तीने भरलेले असते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास करण्यासोबतच दानधर्मही करावे. या दिवशी दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कोणत्या वस्तुंचे दान करावे…
आमलकी एकादशीचे व्रत कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 9 मार्च रोजी सकाळी 7:45 मिनिटांनी सुरू होते आणि 10 मार्च रोजी सकाळी 7: 44 वाजता ही एकादशी संपते. अशावेळेस आमलकी एकादशीचे व्रत 10 मार्च रोजी पाळले जाईल. 11 मार्च रोजी सकाळी 6: 35 ते 8:13 पर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे. यावेळी उपवास सोडावा.
या गोष्टी दान करा
आवळा
असे मानले जाते की भगवान विष्णूंना आवळा हे फळ खूप आवडीचे आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी तुम्ही आवळ्याचे दान करा. कारण आवळ्याचे दान केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्यासोबतच तुम्हाला सौभाग्य सुद्धा प्राप्त होते.
अन्नदान करा
आमलकी एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी अन्नदान करतो त्या व्यक्तीला गायीच्या दाना इतके पुण्य मिळते. तसेच घरात धन आणि समृद्धी वाढते.
काळे तीळ
आमलकी एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करावेत. हे दान खूप शुभ मानले जाते. एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.
पैसे आणि कपडे
आमलकी एकादशीच्या दिवशी गरजूंना पैसे आणि कपडे दान करावेत. या देणगीतून तुम्हाला निश्चितच आर्थिक फायदा होतो. यासोबतच घरातून नकारात्मक ऊर्जाही निघून जाते.
पिवळ्या रंगाच्या वस्तू
आमलकी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. यामुळे घरात सुख आणि शांती येते. याशिवाय, गुरु ग्रह देखील बलवान होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)