मुंबई : मागील दोन वर्षापासून बंद असणाऱ्या अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) यंदा मान्यता देण्यात आली आहे. अमरनाथ (Amarnath Cave) यात्रेची नोंदणी सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षाची प्रतिक्षा संपली असून अनेकजन आता यात्रेच्या तयारीला लागले आहेत. यासाठी बुकिंग सुरु झालं आहे. कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, 2022 मध्ये ही यात्रा पुन्हा सुरू झाला आहे. 2022 ची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अमरनाथ गुहा सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. हे भारताच्या सर्वोच्च हिमालयात जम्मू काश्मिीर राज्यात आहे. जम्मूची राजधानी श्रीनगर पासून 3.888 मिटर उंचीवर आहे येथे हिवाळयात हिन्दू धर्माचे भगवान शंकराची बर्फाची पिंड तयार होते. या गुहेच्या चहूबाजुस उंच उंच डोंगर व टेकडया आहेत. गुफा जवळपास वर्षभर बर्फाने आच्छादीत असते जेव्हां शिवलींग आकार घ्यायला लागते, तेव्हा श्रध्दाळूंसाठी अमरनाथ मंदीराचे व्दार उघडे केले जाते. भारतातुनच नाही तर जगभरातील हिन्दू भावीक येथे दर्शनासाठी येतात, या स्थळाला शिवाचे एक पवित्र ज्योर्तिलिंग मानले जाते.
मध्यकाळातील शतकात या गुहेचा शोध लागला असे म्हटले जाते. 15 व्या शतकात धर्मगुरूंनी अमरनाथ गुहेला एका मंदीराचे स्वरूप दिले. धार्मिक आख्यायिकेनुसार भृगु ऋषींनी क्रोधात काश्मीर मधील बर्फ वितळवुन त्यास जलमग्न केले होते. त्यानंतर कश्यप मूनींनी येथील नदयांमधील पाणी परत बर्फात रूपांतरीत केले आणि अमरनाथ गुहेचा शोध घेउन शिवलिंगाची पुजा केली. सामान्यांच्या मते येथे नैसर्गिक रित्या भोलेनाथ शिवशंकराच्या कृपा व ज्योर्तिलिंगाच्या प्रतापामुळे बर्फाचे शिवलिंग स्थापीत होते.
श्री अमरनाथजी बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून एकूण ४३ दिवस चालणार आहे. या प्रवासासाठी नोंदणी प्रक्रिया 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या यात्रेसाठी नोंदणी करण्यासाठी भाविक अधिकृत वेबसाइट आणि मोबाईल अॅप वापरू शकतात.
जम्मू आणि काश्मीर बँक, पीएनबी बँक, येस बँक आणि एसबीआय बँकेच्या देशभरातील 100 शाखांच्या 446 शाखांमध्येही यात्रेसाठी नोंदणी सुरू आहे.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ