अमावस्या उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : प्रत्येक कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला अमावस्या तिथी म्हणतात. या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही. पण हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. शास्त्रामध्ये दर्श अमावास्येलाही (Amavasya Upay) खूप महत्त्व दिले गेले आहे. या विशेष दिवशी चंद्रदेवाची खऱ्या मनाने पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. तसेच, असे मानले जाते की दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. चला तर जाणून घेऊया, दर्श अमास्या कधी असते आणि काही खास उपाय?
आषाढ दर्श अमावस्या 2023 तारीख
- जेष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या तिथी सुरू होते – 17 जून, सकाळी 09.11 वाजता
- जेष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या तिथी समाप्ती – 18 जून, सकाळी 10.06 वाजता
- दर्श अमास्या तारीख – 17 जून 2023, शनिवार
- जेष्ठ अमावस्या तारीख – 18 जून 2023, रविवार
दर्शन अमावस्येच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत
- दर्शन अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान, तप, तर्पण वगैरे करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर स्थितीत असेल त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करून चंद्र देवाची पूजा करावी. असे केल्याने साधकाला लाभ होतो.
- ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्र देवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते.
- दर्शन अमावस्येच्या दिवशी साधकाने लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या ऑफर्स मिळतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)