Amla Navmi 2023 : आवळा नवमीला अवश्य करा हे उपाय, वर्षभर लाभेल सुख समृद्धी

| Updated on: Nov 21, 2023 | 4:00 PM

यावर्षी आवळा नवमी 21 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी होत आहे. आवळा नवमीला अक्षय नवमी असेही म्हणतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान विष्णू स्वतः आवळा वृक्षात वास करतात. त्यामुळे अक्षय नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. शास्त्रात सांगितले आहे की अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याचे काही खास उपाय केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि पैशाची समस्या दूर होते.

Amla Navmi 2023 : आवळा नवमीला अवश्य करा हे उपाय, वर्षभर लाभेल सुख समृद्धी
आवळा नवमी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आवळा नवमीच्या (Aamla Navmi 2023) दिवशी श्री हरी, भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, वावळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरी केली जाते. यावर्षी आवळा नवमी 21 नोव्हेंबरला म्हणजेच आज साजरी होत आहे. आवळा नवमीला अक्षय नवमी असेही म्हणतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान विष्णू स्वतः आवळा वृक्षात वास करतात. त्यामुळे अक्षय नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. शास्त्रात सांगितले आहे की अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याचे काही खास उपाय केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि पैशाची समस्या दूर होते. चला तर मग जाणून घेऊया अक्षय नवमीला कोणते विशेष उपाय करावेत.

आवळा नवमीला हे उपाय अवश्य करावे

1. आवळा नवमीला गरिबांना अन्नदान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी गरीब व्यक्तीला आवळा झाडाच्या सावलीत बसवून त्याला अन्नदान केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. या उपायांचे पालन केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही.

2. आवळ्याच्या बिया हिरव्या कपड्यात बांधून ठेवल्यास आर्थिक लाभ होतो. ही गाठोडी तुम्ही तिजोरीत किंवा पैशाच्या जागीही ठेवू शकता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही आवळा बियांची बांधलेली पुरचूंडी तुमच्या पैश्याच्या पिशवीत ठेवू शकता. असे केल्याने व्यवसायात कधीही नुकसान होणार नाही.

हे सुद्धा वाचा

3. आवळा नवमीच्या दिवशी आवळा झाडाच्या पानांवर हळदीचे स्वस्तिक बनवा आणि त्याचा वंदनवार करून घराच्या मुख्य दारावर लटकवा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल. घराची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तणाव किंवा भांडणाच्या समस्याही संपतील.

4. आवळा नवमीच्या सणाला घराभोवती आवळ्याचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. घरासमोर आवळ्याचे झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते असे म्हणतात. आवळ्याचे झाड लावताना वास्तुच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका.

आवळा नवमी 2023 शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला साजरी केली जाते. यावेळी नवमी तिथी 21 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज पहाटे 3:16 वाजता सुरू होईल आणि नवमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 1:09 वाजता समाप्त होईल. आवळा नवमीच्या पूजेची वेळ आज 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.48 ते दुपारी 12.07 पर्यंत असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)