Anant Chaturdhashi 2022: या दिवशी आहे अनंत चतुर्दशी, बाप्पांच्या विसर्जनासोबतच भगवान विष्णूंच्या स्मरणाचाही दिवस

| Updated on: Sep 02, 2022 | 8:42 AM

पौराणिक कथेनुसार अनंत चतुर्दशीचे मूळ महाभारतात आहे. हा दिवस भगवान विष्णूचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तल, अटल, प्राण, सुतला, तलतल, रसातल, पातल, भी, भुव, जना, तप, सत्य, महा, असे 14 जग ईश्वराने निर्माण केले.

Anant Chaturdhashi 2022: या दिवशी आहे अनंत चतुर्दशी, बाप्पांच्या विसर्जनासोबतच भगवान विष्णूंच्या स्मरणाचाही दिवस
अनंत चतुर्दशी
Image Credit source: Social Media
Follow us on

Anant Chaturdhash 2022: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे. साधारणतः गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan) दिवस म्हणून या सणाची ओळख असली तरी या दिवशी भगवान विष्णू (Vishnu) यांच्या स्मरणाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात 14 व्या दिवशी येणारा, हा सण महत्वाच्या सणांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार अनंत चतुर्दशीचे मूळ महाभारतात आहे. हा दिवस भगवान विष्णूचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तल, अटल, प्राण, सुतला, तलतल, रसातल, पातल, भी, भुव, जना, तप, सत्य, महा, असे 14 जग ईश्वराने निर्माण केले. त्यांचे पालन आणि संरक्षण करण्यासाठी भगवान विष्णू 14 वेगवेगळ्या अवतारांत या नश्वर जगात आले आणि त्यामुळे त्यांना अनंत नाव पडले. हे सर्व जग आणि त्याच्या निर्मितीचे जतन करण्यासाठी भगवान विष्णूंच्या या अवतारांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळे अनंत चतुर्दशीचा दिवस खूप महत्वाचा आहे.

असे करा बाप्पांचे विसर्जन

गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी एक वस्त्र घ्या. त्यात मोदक, पैसा, दूर्वा आणि सुपारी बांधून घ्या. ते गणपती मूर्तीसोबत ठेवा. गणपतीची आरती करा. या 10 दिवसांत श्री गणेशाची सेवा करताना आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर सम्‍मानपूर्वक गणपतीचं पाण्यात विसर्जन करावे. नदी-तलावाचं पाणी प्रदूषित होऊ नये याची काळजी घ्यावी. गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन शक्यतो कृत्रिम तलावात करावे आणि जल प्रदूषण टाळण्यास हातभार लावावा.

गणेश विसर्जन शुभ मुहूर्त

  1. सकाळचा मुहुर्त- शुक्रवारी, 06:03 ते सकाळी 10:44 पर्यंत
  2. सायंकाळचा मुहूर्त – सायंकाळी 05:00 ते 06:34 पर्यंत
  3. हे सुद्धा वाचा
  4. दिवसाचा मुहूर्त – दुपारी 12:18 ते 01:52 पर्यंत
  5. रात्रीचा मुहूर्त – रात्री 09:26 ते 10:52 पी एम
  6. मध्य रात्रीचा मुहूर्त – रात्री 12:18 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 04:37 पर्यंत

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)