मुंबई : आज अपरा एकादशी (Apara Ekadashi 2021) आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा-अर्चना करण्याचं विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी दरमहिन्याला दोनदा येते. एका वर्षात 24 एकादशी असतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या एकादशीच्या तिथीला अपरा आणि आंचल एकादशी म्हणतात. यादिवशी उपवास ठेवल्यास सर्व त्रास दूर होतात. द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. काही लोक एकादशीला व्रत करतात. या दिवशी भात खाऊ नये. अपरा एकादशीशी संबंधित गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
एकादशी तिथी सुरुवात – 05 जून 2021 सकाळी 4 वाजून 07 मिनिटांपासून
एकादशीची तारीख समाप्त – 06 जून 2021 सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत
व्रत संपन्न मुहूर्त – 07 जून 2021 रोजी सकाळी 05:12 ते सकाळी 07:59 पर्यंत असेल.
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन भगवान विष्णूचे स्मरण करावे आणि व्रताचा संकल्प करा. या दिवशी फळे खा आणि धान्य खाऊ नका. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची विधीवत पूजा करुन विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. दुसर्या दिवशी उपोषण केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान द्या.
धार्मिक मान्यतेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याशिवाय या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. पद्म पुराणानुसार या दिवशी पूजा केल्याने आर्थिक अडचणी सुटतात, ज्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. असा विश्वास आहे की या जन्मात पूजा केल्याने पुढच्या जीवनात आपण धनवान होते.
Jyeshtha Amavasya 2021: कधी आहे ज्येष्ठ अमावस्या? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पुजा विधी आणि महत्वhttps://t.co/9NswdZ2uFV#SPIRITUAL
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021
Apara Ekadashi 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Mohini Ekadashi 2021 : सुख-समृद्धी, आनंद हवाय? मोहिनी एकादशीला हे उपाय करा…
Mohini Ekadashi 2021 | भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार का घेतला होता? जाणून घ्या…