मुंबई : हिंदू धर्मात एकादशी व्रत भगवान श्री विष्णूच्या आराधनेसाठी विशेष मानले जाते. एकादशी दर महिन्याला दोनदा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात येते. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 24 एकादशी व्रत केले जातात. हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक एकादशीला स्वतःचे नाव आणि धार्मिक महत्त्व असते, त्याप्रमाणे आजही वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात अपरा एकादशीचे (Apara Ekadashi 2023) व्रत केले जाते. अपरा एकादशी व्रत, उपासना पद्धती, पारणाची वेळ आणि हिंदू मान्यतेनुसार त्याचे शुभ परिणाम यासंबंधीचे महत्त्वाचे नियम सविस्तर जाणून घेऊया.
हिंदू मान्यतेनुसार वैशाख महिन्यात पाळण्यात येणाऱ्या अपरा एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की नियमांनुसार हे व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत संकटे दूर होतातच, शिवाय दुष्ट आत्म्यांपासूनही मुक्ती मिळते. अपरा एकादशी व्रताच्या शुभ परिणामामुळे साधकाला सर्व सुखांचा उपभोग घेताना शेवटी मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.
पंचांगानुसार आज 15 मे 2023 रोजी अपरा एकादशी व्रत पाळले जात आहे. हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूचे हे व्रत तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्या संबंधी पूर्ण नियम पाळले जातात. पंचांग नुसार, अपरा एकादशी व्रत 16 मे 2023 रोजी सकाळी 06:41 ते 08:13 पर्यंत पाळणे खूप शुभ राहील. या शुभ काळात अपरा एकादशीचे व्रत केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)