पुणे, यंदा आषाढी एकादशी (Ashadhi ekadashi) आणि बकरी ईद (Bakri Eid 2022) एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय पुण्यातील भोरमधील मुस्लिम समाजातर्फे घेण्यात आला आहे.आषाढी एकादशी दिवशी ईदचं नमाज पठण करून, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 11 जुलैला कुर्बानी देण्याचा निर्णय मुस्लिम समाजानी घेतला. तस पत्र मुस्लिम समाजातर्फे भोर तहसीलदार आणि पोलिसांना देण्यात आले आहे. यातून ऐकतेचा संदेश पोहचवत असल्याची भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केलीय.मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचं तालुक्यात कौतुक होत आहे. धर्माच्या नावावर हिंसा भडकावणाऱ्यांनी यातून शिकवण घेण्यासारखे आहे.
हजरत इब्राहिम यांना अल्लाने आपल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. अल्लाने सांगितले असल्याने तेही ही गोष्ट करण्यास तयार झाले होते. या मुलाचे नाव इस्माईल असे होते. पोटचा मुलगा असल्याने इब्राहिम यांना तो अतिशय लाडका होता. पण अल्लाचाआदेश पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी ही अतिशय कठीण गोष्ट मान्य केली. आपल्या मुलाचा बळी देण्यास तयार झालेल्या हजरत इब्राहिम यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात सुरा देण्यात आला. मात्र त्याचवेळी अल्लाने त्यांना खुश करायचे ठरवले. आणि प्रत्यक्ष बळी देण्याच्या वेळी मुलाच्या जागी एक बकरा आणून ठेवला. देवाच्या या कृतीमुळे इब्राहिम देवावर खूपच खुश झाले, कारण आपला मुलगा त्याला कायमसाठी मिळणार होता. तेव्हापासून या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो. या सणामागे त्यागाची भावना असल्याचे सांगितल्या जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)