मुंबई : शास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची आराधना व पूजा-अर्चा केल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रात शुक्रवारसाठी (Astro tips for Friday) काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या दिवशी देवी लक्ष्मीचे उपाय धन, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुख-समृद्धी प्रदान करतात. त्याचबरोबर या दिवशी कुंडलीतील कमजोर शुक्र बळकट करण्यासाठी काही उपायही सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया शुक्रवारी कोणते उपाय केल्याने आर्थिक समस्या दुर होतात
ज्योतिष शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी नियमित पूजा करणे फायदेशीर ठरते. शुक्राचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शुक्रवारी व्रत ठेवा, यामुळे तुम्हाला विशेष लाभ मिळेल.
शुक्रवारी नियमितपणे माता लक्ष्मीच्या श्रीसूक्ताचे पठण करा. असे म्हणतात की याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच शुक्र ग्रहाची स्थितीही मजबूत होते. काही फायदेशीर परिणाम होतील. हा उपाय नियमीत केल्यास घरात पैसा येईल.
शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. यानंतर माता लक्ष्मीला नमन करा. त्यांना त्यांची आवडती फुले अर्पण करा आणि त्यांची पूजा करा.
कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी शुक्रवारी मंदिरात गायीच्या शुद्ध तुपाचे दान करावे. यामुळे शुक्र शक्तीशाली होईल आणि संपत्ती मिळेल.
नोकरी, व्यवसाय आणि इतर कोणत्याही कामात अडथळे येत असतील तर शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला. यामुळे तुमचा अडथळा दूर होईल.
पती-पत्नीचे नाते दृढ करण्यासाठी शुक्रवारी बेडरूममध्ये प्रेमळ पक्ष्याचे चित्र ठेवणे फायदेशीर ठरेल.
असे मानले जाते की कुंडलीतील शुक्र ग्रहाला शांत करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी फक्त पांढरे आणि गुलाबी रंगाचे कपडे घाला. शक्य असल्यास या रंगाचा रुमाल सोबत ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)