मुंबई : एक काळ असा होता जेव्हा लोकं घटस्फोट घेणे ही मोठी गोष्ट मानत होते. परिस्थिती कशीही असली तरी ते लग्न टिकवायचे. संसार मोडू नये यासाठी दोन्ही कडची लोकं प्रयत्न करायची मात्र, आजकाल तसे नसते, मग ते अरेंज्ड मॅरेज असो की लव्ह मॅरेज, अशा अनेक केसेस समोर येतात जेव्हा लग्नानंतर काही महिन्यांनंतर जोडप्यांचा घटस्फोट होतो. यामागे कारण काहीही असो, पण जन्मकुंडलीचेही (Astrology) महत्त्वाचे योगदान असते. कुंडलीत असे काही योग आहेत, ज्यामुळे वैवाहिक जीवनात नेहमीच अडचण निर्माण होते आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.
मंगळ दुसऱ्या, चतुर्थ, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असताना वैवाहिक समस्या उद्भवतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या, सहाव्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या घरातील स्थान आणि कुंडलीतील त्यांचा स्वामी घटस्फोटाची शक्यता निर्माण करतो. सूर्य, मंगळ, शनि, राहू आणि केतू हे ग्रह घटस्फोट योग तयार करतात.
जर कुंडलीत 7 वे घर 6 व्या घरात असेल तर 8 वे घर लग्नाला घटस्फोटाकडे घेऊन जाते. सहाव्या किंवा आठव्या घरातील स्वामी आणि सातव्या घराच्या स्वामीचा संयोग देखील वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करतो. याउलट, जर एखाद्याच्या कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात मंगळ इतर कोणत्याही अशुभ ग्रहाशी संबंधित असेल आणि चढत्या कुंडलीतील सातव्या घराचा स्वामी सहाव्या घरात असेल तर मग घटस्फोटाची शक्यता असते.
यासोबतच एखाद्याच्या कुंडलीतील सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या घरात ग्रहांची स्थिती असल्यास विवाहात घटस्फोट होऊ शकतो. दुसरीकडे पुरुषाच्या कुंडलीत शुक्र पिडीत असेल आणि स्त्रीच्या कुंडलीत मंगळ पीडित असेल तर वैवाहिक जीवनात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत पहिल्या आणि सातव्या भावात किंवा पाचव्या आणि अकराव्या भावात शनि आणि मंगळ एकमेकांशी जुळत असतील तर वैवाहिक समस्या निर्माण होतात. यासोबतच सातव्या किंवा आठव्या भावात शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण करते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)