मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली स्थिती बदलतो. त्याचा प्रभाव सर्व राशींच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ स्वरूपात दिसून येतो. या वर्षी अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. यामध्ये गुरूचाही समावेश आहे. 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या दरम्यान राहू आधीच मेष राशीत बसला आहे. त्यामूळे गुरू आणि राहूच्या संयोगाने गुरु चांडाळ योग तयार होईल. जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल.
ज्योतिष शास्त्रानुसार गुरूचा मेष राशीत प्रवेश आणि राहू सोबत युती कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करणार आहे. या काळात या राशीच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. गुरु चांडाळ योग तुमच्यासाठी अडचणी निर्माण करेल. अशा स्थितीत बोलण्यावर नियंत्रण ठेवणे चांगले.
गुरू आणि राहूच्या संयोगाने गुरु चांडाळ योग तयार होईल. या काळात मिथुन राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांनी गुंतवणूक करणे टाळावे. शेअर मार्केट आणि लॉटरीत पैसे गुंतवण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा. धनहानी होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत या लोकांसाठी उत्पन्नाची कमतरता असू शकते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला तणावाचाही सामना करावा लागू शकतो.
मेष राशीत गुरूचे संक्रमण आणि मेष राशीत राहूची उपस्थिती या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करेल. या दरम्यान या राशीच्या लोकांना धनहानी होऊ शकते. आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आरोग्याशी संबंधित समस्या मेष राशीच्या लोकांना त्रास देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण गुरु चांडाळ योगामुळे कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतो. कोठेही नवीन गुंतवणूक करणे टाळा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)