Astrology : बुधाचा अस्त या राशींसाठी ठरणार भाग्याचा, होणार मोठा धनलाभ

| Updated on: Apr 15, 2023 | 9:13 PM

ग्रहांचा राजकुमार बुध 23 एप्रिल रोजी मेष राशीमध्ये उलट फिरणार आहे. अशा स्थितीत अनेक राशींच्या जीवनावर त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येईल. बुधाच्या अस्तामुळे आरोग्य, व्यवसाय, नोकरी, प्रकृती तसेच प्रगतीच्या क्षेत्रात खूप प्रभाव पडेल.

Astrology : बुधाचा अस्त या राशींसाठी ठरणार भाग्याचा, होणार मोठा धनलाभ
बुधादित्य योग
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतो. ग्रहांच्या राशी बदलामुळे, सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो. ग्रहांचा राजकुमार बुध 23 एप्रिल रोजी मेष राशीमध्ये उलट फिरणार आहे. अशा स्थितीत अनेक राशींच्या जीवनावर त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येईल. बुधाच्या अस्तामुळे आरोग्य, व्यवसाय, नोकरी, प्रकृती तसेच प्रगतीच्या क्षेत्रात खूप प्रभाव पडेल. मेष राशीत बुध अस्त झाल्यामुळे अनेक राशींना त्याचा लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

कन्या

ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह या राशीच्या आठव्या घरात अस्त करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. पैशांची बचत आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये यश मिळेल. तुम्हाला करिअरमध्ये काही चांगल्या ऑफर्स मिळतील. भागीदारीत काम केल्यास यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.

तूळ

या राशीच्या सातव्या घरात बुध अस्त करणार आहे. बुध हा नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी मानला जातो. या कारणास्तव या राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती संमिश्र असणार आहे. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुम्ही वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

हे सुद्धा वाचा

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी बुध आहे, पण कुंभ राशीच्या तिसऱ्या घरात बुध अस्त करणार आहे. हे धैर्य आणि आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते. तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ झालेली दिसेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप छान असणार आहे, तुम्ही कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)