Ayodhya : अयोध्येत हॉटेल बुकींग फुल्ल, जे उपलब्ध आहेत त्यांचं भाडं वाचून थक्क व्हाल

| Updated on: Jan 16, 2024 | 10:41 AM

Ayodhya Hotel booking रामलल्लाच्या मंदिरामुळे केवळ रस्तेच नाही तर विमानतळही अयोध्येतील पर्यटन उद्योगाला चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत या महिन्यासाठी अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत. अयोध्या राम मंदिराच्या 170 किलोमीटरच्या परिघात लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये हॉटेल्सची मागणी झपाट्याने वाढली आहे.

Ayodhya : अयोध्येत हॉटेल बुकींग फुल्ल, जे उपलब्ध आहेत त्यांचं भाडं वाचून थक्क व्हाल
अयोध्येत हॉटेलच्या किंमती किती?
Image Credit source: Social Media
Follow us on

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Hotel Price)  22 जानेवारीला राम लल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. रामलल्लाच्या मंदिरामुळे केवळ रस्तेच नाही तर विमानतळही अयोध्येतील पर्यटन उद्योगाला चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत या महिन्यासाठी अयोध्येतील जवळपास सर्व हॉटेल्स 100 टक्के बुक झाली आहेत. अयोध्या राम मंदिराच्या 170 किलोमीटरच्या परिघात लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये हॉटेल्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. एका वेबसाईटशी बोलताना, सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे एमडी आणि संस्थापक म्हणाले की त्यांच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे 85 हजारांच्या पुढे गेले आहे.

महागड्या हॉटेल्समुळे रूमच्या किमती वाढल्या

सिग्नेट कलेक्शनने अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या 45 टक्के खोल्या टेंपल ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत जेणेकरून VIP लोकांना तिथे राहता येईल. रॅडिसनने गेल्या बुधवारी अयोध्येत पार्क इन उघडले होते आणि 21 जानेवारीपर्यंत ते पूर्णपणे बुक झाले आहे. सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलच्या सर्व खोल्या या महिन्यासाठी आगाऊ बुक केल्या आहेत. त्यांची प्रत्येक खोली सुमारे 85 हजार रुपये किमतीत आणि त्याहूनही महागडी खरेदी करण्यात आली आहे.  रॅडिसन पार्क इन हॉटेल लाँच झाल्यानंतर लगेचच बुकिंगचा पूर आला. हॉटेलने कोणत्याही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर खोलीच्या किमती शेअर केल्या नसल्या तरी, सर्व हॉटेलच्या खोल्या 21-22 जानेवारीसाठी बुक केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर सेवा सुरू

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नुकतेच पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले. यासोबतच महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सेवा सुरू झाली आहे. याचा फायदा विमान कंपण्यासह रेल्वेलाही होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास अनेक क्षेत्रांना याचा लाभ होणार आहे.