Bada Mangal 2023 : आज पहिला मोठा मंगळ, बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी अवश्य करा हे उपाय

| Updated on: May 09, 2023 | 10:47 AM

असे मानले जाते की या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. या दिवशी काही निशीद्ध गोष्टी अशुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया बडा मंगलच्या दिवशी काय करू नये.

Bada Mangal 2023 : आज पहिला मोठा मंगळ, बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी अवश्य करा हे उपाय
हनुमान
Image Credit source: Hanuman Jayanti
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात मंगळवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. हिंदी भाषिकांचा ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार हा बडा मंगल (Bada Mangal 2023) म्हणून ओळखला जातो.  आज 9 मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील पहिला मोठा मंगळ आहे. मोठा मंगळला बडा मंगल असेही म्हणतात. या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. या दिवशी काही निशीद्ध गोष्टी अशुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया बडा मंगलच्या दिवशी काय करू नये. या गोष्टी केल्याने हनुमान जी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

मोठ्या मंगळाच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

  1.  बडा मंगळाच्या दिवशी मीठ, मांस आणि मद्य सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. या दिवशी या गोष्टींचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात अडथळे येऊ शकतात.
  2.  या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज टाळावे. असे मानले जाते की मंगळवारी एखाद्याला पैसे उधार दिल्यास, तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते.
  3. या दिवशी कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट भावना, मनात राग आणू नये, तसेच  अपशब्द बोलू नये.
  4. बडा मंगळाच्या दिवशी उत्तर दिशेला प्रवास करणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी पश्चिम दिशेला प्रवास करणे टाळावे. पण प्रवास करायचाच असेल तर जाण्यापूर्वी गूळ जरूर घ्या.
  5. हनुमानजींना लाल रंग खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत या दिवशी पांढरे किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत.
  6. हनुमानजींना बाल ब्रह्मचारी मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी पूजा करताना महिलांनी चुकूनही हनुमानजींना स्पर्श करू नये. महिलांनी टिळा लावू नयेत आणि त्यांना वस्त्रही देऊ नये. तुम्हाला हवे असल्यास हनुमानजींच्या चरणी दिवा लावू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)