आज देशभरात बकरी ईद (Bakri eid) सण साजरा केला जात आहे. बकरी ईद (Bakri eid 2022) म्हणजेच ईद-उल-अजहा हा इस्लाम धर्माचा दुसरा सर्वात महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, बकरीद हा सण बाराव्या महिन्याच्या 10 तारखेला साजरा केला जातो. बकरी ईद हा सण रमजान संपल्यानंतर 70 दिवसांनी येतो. या दिवशी इस्लाम धर्माचे लोक मशिदीत जाऊन नमाज अदा करतात आणि नंतर बकऱ्यांची कुर्बानी देतात. मात्र, बळी देताना अनेक जणांकडून जाणीवपुर्वक काही चुका होतात. चला तुम्हाला त्याग संबंधित अशा 5 चुका जाणून घेऊया ज्या इस्लाममध्ये चुकीच्या मानल्या जातात.
इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. कुराणानुसार, एकदा अल्लाहने हजरत इब्राहिम यांची परीक्षा घेतली. त्याने हजरत इब्राहिम यांना आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहिम यांचे त्यांचा मुलगा हजरत इस्माईल याच्यावर खूप प्रेम होते आणि तो त्यांना त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय होते.
पण अल्लाहचा आदेश मिळाल्यानंतर हजरत इब्राहिम यांचा नाईलाज झालाआणि त्यांनी पुत्रप्रेमाऐवजी अल्लाहचा आदेश निवडला. हजरत इब्राहिम यांनी आपल्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेतला. हजरत इब्राहिम यांना वयाच्या 80 व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती, त्यामुळे त्यांच्या मुलाचा बळी देणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम होते.
अल्लाहचे नाव घेत हजरत इब्राहिम यांनी डोळे बंद केले आणि मुलाच्या मानेवर चाकू ठेवला. पण जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की, त्याचा मुलगा त्याच्या शेजारी जिवंत उभा होता आणि त्याच्या जागी एक शेळीसदृश प्राणी चिरलेला होता. त्या दिवसापासून कुर्बानी सुरू झाल्याचे सांगितले जाते. जेव्हा प्रेषित इब्राहिम आपल्या मुलाची कुर्बानी देणार होते, तेव्हा अल्लाहने एक संदेशवाहक पाठवला आणि मुलाच्या जागी एक बकरी दिली अशी आख्यायिका आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)