मुंबई : शीतला सप्तमी (shitla Saptami) हा सण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमीला तिथीला साजरा केला जातो . या दिवशी माता शीतलाची पूजा केले जाते. या दिवशी देवीला शिळे अन्न नैवेद्या म्हणून दिले जाते. यासाठी सप्तमीच्या रात्री शिळे अन्न केले जाते आणि सकाळी शीतला मातेची पूजा करून प्रसाद म्हणून खाल्ली जाते.यामुळेच या सणाला बासोदा असेही म्हणतात. देवी शीतला ही आरोग्याची (Health) देवी असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की ज्याच्यावर माता शीतलाची कृपा असते त्याला सर्व वेदनादायक रोगांपासून मुक्ती मिळते. स्कंद पुराणात (Skanda Puran), माता शीतला चेचक, गोवर आणि कॉलरा यांसारख्या संसर्गजन्य रोगांपासून रक्षण करणारी देवी म्हणून वर्णन करण्यात आले आहे. होळीनंतर हा सण साजरा केला जातो.
या सणाचे महत्त्व
यावेळी शुक्रवार, 24 मार्च रोजी शीतला सप्तमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी भक्त सर्वतोपरी प्रयत्न करतात. शीतलाष्टकामध्ये तुम्हाला या दिवसाचे महत्त्व समजते. भगवान शंकरांनी लोककल्याणासाठी त्याची रचना केली होती असे म्हणतात. यामध्ये शीतला देवीचा महिमा सांगितला आहे. जर एखाद्या व्यक्तीने दररोज हे पाठ केले तर त्याच्यावर माता शीतलाची कृपा कायम राहते अशी मान्यता आहे.
या दिवस या मंत्राचा जप करा
शीतलाष्टक स्तोत्र
ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री शीतलाय नमः म्हणत या स्तोत्राची सुरुवात करा.
विनियोग
ओम अस्य सृष्टितला स्तोत्रस्य महादेव ऋषियः, अनुष्टुप छंदः, शीतली देवता, लक्ष्मी बीजम, भवानी शक्तीः, सर्व विस्फोटक निवृत्तये जप विनियोगः
मंत्र
ओम ह्रीं श्री शीतलाय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करा.
देवीची आरती
वंदे आहं शीतलन देवी रासस्थान दिगंबरम मर्जानी कलशोपेता शूरपालम लिखित मस्तकम
वंदेहम् शीतलन देवी सर्व रोग भयपहं यमसद्य निवर्तेत स्फोटक भैय्या महत्
शीतले शीतले चेति यो ब्रुयाद्दार बळीः स्फोटकं घोरं क्षिप्राण तस्य प्राणस्यति
यथावमुदक मधे तू धृत्वा पूजयते नरः स्फोटकभयं घोर घये तस्य न जायते
शीतलज्वर दग्धस्य पुट्टीगंड्युतस्य च प्रस्थाचक्षुषाः पुसत्वमहुर्जीवनौषधा
शीतले तनुजन रोगन्नरणम् हरसी धूस्त्यजन विस्फोटक विदिर्णनम् त्वमेका अमृत वर्षांणी
गलगंडग्रह रोग ये चान्ये दारुण नृणं त्वदानु ध्यान मात्रेन शीतले यांति संक्षयाम्
न मंत्र नौसाधम् तस्य पापरोगस्य विद्याते त्वमेका शीतले धात्रिम नान्यम् पश्यमि देवताम्
फल-श्रुति
मृणालतन्तु सद्दशीं नाभिहृन्मध्य संस्थिताम् यस्त्वां संचिन्तये द्देवि तस्य मृत्युर्न जायते
अष्टकं शीतला देव्या यो नरः प्रपठेत्सदा विस्फोटकभयं घोरं गृहे तस्य न जायते
श्रोतव्यं पठितव्यं च श्रद्धा भक्ति समन्वितैः उपसर्ग विनाशाय परं स्वस्त्ययनं महत्
शीतले त्वं जगन्माता शीतले त्वं जगत्पिता शीतले त्वं जगद्धात्री शीतलायै नमो नमः
रासभो गर्दभश्चैव खरो वैशाख नन्दनः शीतला वाहनश्चैव दूर्वाकन्दनिकृन्तनः
एतानि खर नामानि शीतलाग्रे तु यः पठेत् तस्य गेहे शिशूनां च शीतला रूङ् न जायते
शीतला अष्टकमेवेदं न देयं यस्य कस्यचित् दातव्यं च सदा तस्मै श्रद्धा भक्ति युताय वै
श्रीस्कन्दपुराणे शीतलाअष्टक स्तोत्रं
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Panchang Today 24 March 2022, 24 मार्च 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Swapna Shastra | सावधान ! स्वप्नात या गोष्टी दिसणं म्हणजे अडचणी नक्की येणार, आताच सावध व्हा
लोककला ,संस्कृती , धार्मिक प्रथा- परंपरेचा सुंदर संगम, तळकोकणात शिमगोत्सव साजरा