मुंबई : हिंदू धर्मातील रामाचा महिमा सर्वांनाच माहीत आहे. त्रेतायुग होऊन गेले आणि आता कलियुग सुरू आहे. तरीही कलियुगात भगवान रामाच्या (Bhagwan Ram) जीवन प्रवासाचा प्रभाव अजुनही पाहायला मिळतो. प्रभू रामाच्या चरित्राचा आणि जीवनातील संघर्षाचा दाखला कठीण प्रसंगाला तोंड देताना दिला जातो. यासाठीच राम नावाच्या जपाला देखील विशेष महत्त्व आहे. राम रामाने कलियुगात मोक्षप्राप्त होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. रामचरितमानमध्ये या गोष्टीचे सविस्तर वर्णन केले आहे. रामायण काळाबद्दल बोलायचे झाले तर, प्रभू राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले हे आपणा सर्वांना माहीत आहे.
रणांगणात एका बाजूला रामाचे सैन्य उभे होते आणि रावणाचे सैन्य दुसऱ्या बाजूला उभे होते. जेव्हा भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा भगवान रामाने अनेक वेळा युद्धात रावणाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण रावणही खूप शक्तिशाली होता. त्याला युद्धात पराभूत करणे इतके सोपे नव्हते. तेव्हा भगवान रामाने सूर्यदेवाची अत्यंत गुप्त स्तुती केली. प्रभू रामाने रावणावर विजय सूर्याची कोणती उपासना केली होती ते जाणून घेऊया.
राम आणि रावण यांच्यात युद्ध चालू होते. रावण हा अतिशय शक्तिशाली होता त्यामुळे प्रभू राम अनेक प्रयत्न करूनही शक्तिशाली रावणाचा पराभव करू शकत नव्हते. त्यावेळी अगस्त्य ऋषी भगवान रामाकडे आले आणि भगवान रामांना म्हणाले, हे सर्व जग तुमच्या अधिपत्याखाली आहे, मग हा रावण तुमच्यासमोर काय आहे? तरीही, मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही रघुकुल नंदन सूर्यवंशी आहात. तुम्ही गुप्तपणे मी लिहिलेल्या भगवान सूर्यदेवांच्या आदित्यहृदय स्तोत्राचे तीनदा पाठ करा. यानंतर, तुम्हाला विजयाचे वरदान नक्कीच मिळेल आणि ते तुम्हाला युद्ध जिंकण्यास मदत करेल.
प्रभू रामाने अगस्त्य ऋषींनी दिलेल्या आदित्य हृदय स्तोत्राचे तीन वेळा पाठ केले आणि नंतर रावणाचा वध केला. वाल्मिकी रामायणातील युद्धकांडात या घटनेचे तपशीलवार वर्णन आहे.
रणांगणात एका बाजूला रामाचे सैन्य उभे होते आणि रावणाचे सैन्य दुसऱ्या बाजूला उभे होते. जेव्हा भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा भगवान रामाने अनेक वेळा युद्धात रावणाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण रावणही खूप शक्तिशाली होता. त्याला युद्धात पराभूत करणे इतके सोपे नव्हते. तेव्हा भगवान रामाने सूर्यदेवाची अत्यंत गुप्त स्तुती केली.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)