मुंबई : व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि 14 फेब्रुवारीला संपतो. या महिन्यांमध्ये व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Week 2022)साजरा केला जातो ,या वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी पासून होते आणि या दिवशी पहिला दिवस म्हणजेच रोज डे (Rose Day) साजरा केला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन डे पर्यंत हे दिवस साजरे केले जातात. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान येणारा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या दिवसाच्या नावाने साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये एक कपल एकमेकांना फुल, चॉकलेट ,गिफ्ट इत्यादी देतात. पण आपल्या आयुष्यात नेहमी कोण हवंच असा अट्टाहास नको. दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वत:वर प्रेम करा.
‘व्हॅलेंटाईन’ म्हटलं की प्रत्येकाला एकमेकांच्या प्रेमात बुडालेले जोडपी पटकन आठवतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा फक्त जोडप्यांपूरता मर्यादित नाही. ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुमच्या आयुष्यातील कोणतीही व्यक्ती जिच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, जी तुम्हाला आवडते तिच्यासोबत तुम्ही हा दिवस साजरा करू शकता, मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. तुमचा जोडीदार, तुमचे आई-वडील, तुमचे बहिण-भाऊ, तुमचे मित्र-मैत्रिणी कोणीही तुमचे व्हॅलेंटाईन असू शकते. पण इतर कोणासाठी व्हॅलेंटाईन होण्याआधी तुम्ही सर्वात आधी स्वत:चे व्हॅलेंटाईन व्हायला पाहिजे.
तुम्हाला हवं ते खा :
स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या आवडीचे, हवं ते पदार्थ खाणे. डायट बाजूला ठेवून कॅलरीज, फॅट्स, वजन कोणताही विचार करून तुम्ही स्वत:ला अडवू नका. तुमच्या आवडीच्या ठिकाणी जाऊन, आवडीच्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारा.
तुमच्या आवडीचे चित्रपट, सिरीज बघा :
तुम्हाला एखादा चित्रपट किंवा वेब सिरिज पाहायची आहे पण तुम्हाला कोणी सोबत नाही म्हणून तुम्ही अजून पाहिली नसेल तर आता कोणाचीही वाट पाहू नका. तुम्हाला जो चित्रपट, सिरिज आवडते ते तुम्ही पाहू शकता.
तुम्हाला जे वाटत स्पष्टपणे व्यक्त करा :
बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे पटत नाही अशा वेळी आपण दुखवलो तरी पण आपण त्यांना काहीच सांगत नाही, असे अजिबात करू नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर ती समोरच्याला नम्रतेने आणि स्पष्टपणे सांगा. दुसऱ्यांचे वागणे, बोलणे स्वत: वर लादून घेऊ नका. तुम्ही समोरच्या सोबत स्पष्टपणे बोलल्यामुळे गैरसमजही होत नाही.
पुरेशी झोप घ्या :
तुम्हाला स्वत:ला आनंदी ठेवायचे असेल, स्वत:चा मूड चांगला ठेवायचा असेल तर पुरेशी झोप घ्या. निवांत झोपा. तुमची झोप चांगली झाली तर आरोग्याही चांगले राहते आणि मनही शांत राहते.
Skin Care : चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर तांदळाच्या पाण्याचा शीट मास्क, जाणून घ्या कसे वापरायचे!
Homemade Hair Mask : कोरड्या केसांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की वापरून पाहा!