Bhagwat Geeta Quote Marathi : आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश

| Updated on: Dec 22, 2023 | 8:01 AM

जीवनातील निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे. जीवन घडवणाऱ्या या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. आयुष्याच्या कठीण प्रसंगी माणसाला योग्य दिशा दाखवणारा प्रकाश म्हणजे भागवत गीतेतले ज्ञान आहे.

Bhagwat Geeta Quote Marathi : आज गीता जयंती निमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा जीवन घडवणारे संदेश
भागवत गीता
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आज गीता जयंती साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार आजच्याच दिवशी श्री कृष्णाने अर्जूनाला भागवत गीतेचे रहस्य सांगितले होते. कुरूक्षेत्रात स्वतःच्याच नातेवाईकांना पाहून अर्जून शस्त्र टाकण्याची इच्छा बोलून दाखवतो. तेव्हा श्री कृष्ण त्याला गीता रहस्य सांगतात. भागवत गीतेमध्ये दिलेले ज्ञान (Bhagwat Geeta Quote Marathi) हे अमुल्य आहे. जीवन घडवणाऱ्या या उपदेशांचे पालन केल्यास जीवनात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही. आयुष्याच्या कठीण प्रसंगी माणसाला योग्य दिशा दाखवणारा प्रकाश म्हणजे भागवत गीतेतले ज्ञान आहे. आज गीता जयंतीच्या निमित्त्याने भागवत गीतेतले काही अर्थपूर्ण जीवन घडवणारे उपदेश आपण जाणून घेऊया.

भागवत गीतेतले जीवन घडवणारे संदेश

१) जे भूतकाळात घडून गेल ते चांगल्यासाठीच घडले, जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे तेसुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे.

२) बदल हा विश्वाचा नियम आहे. तुम्ही कधी, क्षणात लक्षाधीश होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता.

हे सुद्धा वाचा

३) जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका.

४) कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.

५) माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे, जे फक्त त्याच्याच हातात आहे.

६) तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या, कधीही स्व: इच्छेने स्वत:ला उध्वस्त करु नका, हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते.

७) अती आनंदी असताना आणि अती दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका. कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत.

८) ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही.

९) फक्त मनच तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो.

१०) गीतेनुसार काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही, नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते. मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता!!

११) श्रीकृष्ण म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात.
१२) माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच मरतो, त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे तो स्वतः भोगतो.

१३) गीतेच्या मते, काळ हा जीवन समजून घेण्याची चांगली संधी आहे. आज मिळालेला दिवस जीवन जगण्याची दुसरी संधी आहे!!

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)