मुंबई : सूर्यदेवाला यश, आरोग्य, आत्मविश्वास, नेतृत्व याचा कारक मानन्यात योतो . सूर्यदेवाची उपासना केल्याने माणसाला भरपूर यश मिळते, आरोग्य मिळते. हिंदू धर्मात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे, सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरीकडे, भानु सप्तमी (Bhanu Saptami 2023) तिथी सूर्य देवाला समर्पित आहे. भानु सप्तमी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी भानु सप्तमी 25 जून 2023 रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित असल्याने, भानु सप्तमी रविवारी आल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भानु सप्तमीच्या दिवशी केलेले उपाय सूर्यदेवाची अपार आशीर्वाद देतात, यामुळे जीवनात मोठे यश मिळते, तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
भानु सप्तमीला सकाळी लवकर स्नान करावे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून केशरी रंगाचे कपडे घालणे चांगले. यानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षत, लाल फुले, चंदन आणि साखर टाका. त्यानंतर ते पाण्याने भरून सूर्यदेवाच्या ‘ओम सूर्याय नमः’ मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात.
जर तुम्हाला नियमानुसार सूर्यदेवाची उपासना करता येत नसेल तर किमान सूर्य मंत्रांचा जप करा.
1. ॐ मित्राय नमः.
2. ॐ रवये नमः.
3. ॐ सूर्याय नमः.
4. ॐ भानवे नमः.
5. ॐ खगाय नमः.
6. ॐ पूष्णे नमः.
7. ॐ हिरण्यगर्भाय नमः.
8. ॐ मरीचये नमः.
9. ॐ आदित्याय नमः.
10. ॐ सवित्रे नमः.
11.ॐ अर्काय नमः.
12. ॐ भास्कराय नमः.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)