Bhaum Pradosh Vrat 2023 : वर्षातला पहिला भौम प्रदोष व्रत आज, महत्त्व आणि पुजा विधी

| Updated on: Sep 12, 2023 | 9:46 AM

भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरासोबत हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशी  धार्मिक मान्यता आहे. आज वर्षातील पहिले भोम प्रदोष व्रत आहे.

Bhaum Pradosh Vrat 2023 : वर्षातला पहिला भौम प्रदोष व्रत आज, महत्त्व आणि पुजा विधी
प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत (Bhaum Pradosh Vrat) केले जाते. मंगळवारी जेव्हा प्रदोष व्रत येते तेव्हा त्याला भौम प्रदोष व्रत म्हणतात. भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि हनुमानाची पूजा करण्याची परंपरा आहे. भौम प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकरासोबत हनुमानाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशी  धार्मिक मान्यता आहे. आज वर्षातील पहिले भोम प्रदोष व्रत आहे. या शिवाय हे प्रदोष व्रत श्रावण महिन्यात आल्याने याचे महत्त्व आधिकच वाढलेले आहे. जाणून घेऊया या व्रताची पूजा पद्धती आणि शुभ मुहूर्त. तसेच काही प्रभावी उपायांबद्दलही जाणून घेऊया ज्यामुळे वेगवेगळ्या समस्यांपासून सुटका मिळेल.

भौम प्रदोष व्रताच्या शुभ मुहूर्त

आज भौम प्रदोष व्रतासाठी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:30 ते 08:49 पर्यंत आहे. तुम्ही सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटे पूजा करू शकता.

भौम प्रदोष पूजेची पद्धत

भौम प्रदोषावर संध्याकाळी स्नान करून संध्या-वंदना करावी. भगवान शिवाची आराधना करा. घराच्या ईशान्य कोपर्‍यात भगवान शिवाची स्थापना करा. भगवान शंकराला फुले, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. कुशाच्या आसनावर बसून भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा. या दिवशी ‘ओम नमः शिवाय’ किंवा महामृत्युजन्य मंत्राचा जप करणे उत्तम. यानंतर, आपल्या समस्यांच्या समाप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करा. शिवाची पूजा केल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे.

हे सुद्धा वाचा

मंगळ दोषापासून मुक्ती

भौम प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी हनुमानजीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यांना हलवा पुरीचा नैवेद्य दाखवा. सुंदरकांड पाठ करा. मंगल दोष समाप्त होण्यासाठी प्रार्थना करा. हलवा पुरीचा प्रसाद गरिबांमध्ये वाटून घ्या. मंगळ दोषाच्या त्रासापासून आराम मिळेल.

रोगांपासून मुक्तता

लाल वस्त्र परिधान करून हनुमानाची पूजा करा. हनुमानजींना लाल फुलांची माळ अर्पण करा. दिवा लावून गुळाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर संकटमोचन हनुमानाष्टक 11 वेळा पठण करावे. गूळ अर्पण करून वाटून प्रसाद म्हणून सेवन करावे.

कर्जापासून मुक्ती मिळवीण्यासाठी

भौम प्रदोषाच्या रात्री कर्जमुक्तीचा उपयोग करा. रात्री हनुमानजीसमोर तुपाचा दिवा लावा. या दिव्यात नऊ कापूर ठेवा. यानंतर हनुमानजींना जितके वय असेल तितके लाडू अर्पण करा. त्यानंतर “हन हनुमते रुद्रथकाय हम फट” च्या 11 माळा जप करा.

या गोष्टींची काळजी घ्या

भौम प्रदोष व्रतात फक्त फळे आणि पाण्याचे व्रत करावे. धान्य खाणे टाळावे. भगवान शिवासोबत देवी पार्वतीचीही पूजा करा. भगवान शंकराला केतकी, केवडा अर्पण करू नये. उपवास नसला तरी सात्विक अन्नच सेवन करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)