2022 सालातील आणखी एका मोठ्या खगोलीय घटनेपासून आपण फक्त एक दिवस दूर आहोत. वर्षातील सर्वात मोठा सुपरमून (Super moon 2022) आज (13 जुलै) रोजी दिसणार (13 july super moon) आहे. हा सुपरमून या आठवड्यात तीन दिवस दिसेल, असे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने म्हटले आहे. सुपरमून हा शब्द अनेकांनी एकला असेल, मात्र याचा नेमका अर्थ काय होतो हे बहुतेकांना माहिती नाही. नासाच्या माहितीनुसार, जेव्हा चंद्र पूर्ण असतो त्याच वेळी चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते, तेव्हा सुपरमून होतो. “सुपरमून” हा शब्द 1979 मध्ये तयार करण्यात आला. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्या दिवशी सुपरमून दिसतो. ओल्ड फार्मर्स अल्मॅनॅक हवामान अंदाज असलेल्या संदर्भ पुस्तकानुसार, सुपरमूनला बक मून असेही म्हणतात, याचा अर्थ चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल तेव्हा सुपरमून दिसेल.
नासाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटेपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत सुमारे तीन दिवस चंद्र पूर्ण दिसेल. आज रात्री 12:07 वाजता सुपरमून दिसेल. यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल. या काळात चंद्र पृथ्वीपासून केवळ 357,418 किमी अंतरावर असेल.
सुपरमून वर्षातून फक्त तीन ते चार वेळा दिसतो. 2022 चा पहिला सुपरमून जूनमध्ये होता. वर्षातील तिसरा आणि शेवटचा सुपरमून ऑगस्टमध्ये दिसणार आहे. त्यानंतर तो 18 सप्टेंबर 2024 रोजी दिसणार आहे.
जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीने व्यापलेला असतो, तेव्हा ब्लड मून असतो. परंतु काळा होण्याऐवजी तो लाल रंगाचा होतो. हेच एकमेव कारण आहे की पूर्ण चंद्रग्रहणाला कधीकधी ‘रेड ब्लड मून’ असे म्हणतात.
नासाने म्हटले की, “ग्रहण लागलेला चंद्र त्यावेळी जगभरात होणाऱ्या सर्व सूर्यास्त आणि सूर्योदयांचा शिल्लक लाल-नारंगी प्रकाशामुळे मंदपणे प्रकाशित होतो. ग्रहणादरम्यान पृथ्वीच्या वातावरणात जितकी अधिक धूळ किंवा ढग असतील, चंद्र तितकाच जास्त लाल दिसेल.”
नासाच्या मते, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर सूर्याचे किरण वळतात आणि पसरतात. लाल किंवा नारंगीपेक्षा निळा किंवा व्हायलेटचा रंग जास्त प्रमाणात पसरतो. म्हणून, आकाशाचा रंग निळा दिसतो. लाल रंग सरळ दिशेने सरकतो, म्हणून तो केवळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळीच दिसतो.