मुंबई : असे म्हणतात की कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले नियोजन आवश्यक आहे. परंतु काही वेळा व्यक्तीचे नशीब असे असते की, कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. यासाठी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर (Brahma Muhurat Tips) उठून 2 अचूक उपायांचा अवलंब करावा लागेल, ज्यामुळे तुमचे नशीब तर बदलेलच शिवाय यश तुमच्या मागे येईल. सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्त अत्यंत विशेष मानला जातो. या काळात उठणे आणि कोणतेही काम करणे खूप शुभ मानले जाते. तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रगती हवी असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठून या 2 गोष्टी करा.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये ब्रह्म मुहूर्ताला अतिशय विशेष आणि शुभ मानले जाते. या काळात उठल्यानंतर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे म्हणतात. धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे चार ते पहाटे साडेपाच अशी मानली जाते. ब्रह्म मुहूर्तावर उठण्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि अशा लोकांचे भाग्य उंचावर असते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)