Budhwar Upay : बुधवार व्रताचे आहेत अनेक फायदे, या दहा गोष्टी लक्षात ठेवा

| Updated on: Apr 18, 2023 | 5:33 PM

बुधवार हा भगवान गणेशाला समर्पित आहे, जो संकट दूर करणारा, दु:ख दूर करणारा आणि आनंद देणारा आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने आणि मनोभावे गणेशाची आराधना केलीत तर तुम्हाला अनेक फायदेही मिळतात.

Budhwar Upay : बुधवार व्रताचे आहेत अनेक फायदे, या दहा गोष्टी लक्षात ठेवा
बुधवार उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पौराणिक मान्यतेनुसार बुधवारचे व्रत (Budhwar Upay) रेवती नक्षत्रातील बुधवारपासून सुरू करावे आणि त्यानंतर सलग सात बुधवारी हे व्रत करावे. या व्रताचे नियम पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या व्रताने जीवनात सुख-शांती नांदते आणि घर धन-धान्याने भरून जाते. आठवड्यात सात दिवस असतात, या सात दिवसांचे प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. ज्याचा प्रभाव कुंडलीत ग्रहांवरही पडतो. बुधवार हा बुध देवाचा दिवस आहे. ज्याला प्रसन्न करून तुम्ही बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि पगारवाढीचे वरदान मिळवू शकता. बुधाला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. हिरवा रंग शुभ आणि हिरवळतेचे प्रतीक आहे.

बुधवार या दिवसाच्या संदर्भात शास्त्रांमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की या दिवशी केलेली कोणतीही शुभ यात्रा लाभदायक नाही. बुधवारी मुलींना सासरच्या घरी आणले जात नाही. बुधवार हा भगवान गणेशाला समर्पित आहे, जो संकट दूर करणारा, दु:ख दूर करणारा आणि आनंद देणारा आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने आणि मनोभावे गणेशाची आराधना केलीत तर तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. काम तर प्रत्येकजण करतो, पण प्रत्येकाला त्यांच्या कार्याचे फळ मिळत नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज असते. बुधदेव हे ज्ञान देणारे आहेत.

हे सुद्धा वाचा

बुधवार व्रताची पौराणिक कथा

  •  शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारपासून हे व्रत करणे शुभ मानले जाते.
  • सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध झाल्यावर बुध देवतेची पूजा करावी.
  • हिरवे कपडे परिधान करून पूजा केल्यास अधिक उत्तम फळ प्राप्त होते.
  • व्रत सुरू करण्यापूर्वी गणेशासह नवग्रहाची पूजा करणे आवश्यक मानले जाते.
  • पूजेसाठी बुध देवतेची मूर्ती न मिळाल्यास शंकराच्या मूर्तीची पूजा करता येते.
  • दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळीही पूजा करावी.
  • पवासात भागवत महापुराणाचे पठणही करता येते.
  • याशिवाय बुधवारच्या व्रतामध्ये हिरव्या रंगाचे कपडे, फुले किंवा भाजीपाला इत्यादींचे दान करावे.
  • या दिवशी दही, मूग डाळीची खीर किंवा हिरव्या वस्तूंनी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)