मुंबई : लाल किताबानुसार बुधवार (Budhwar Upay) हा प्रथम पूजनीय भगवान गणेश आणि माता दुर्गा यांना समर्पित आहे. ज्यांच्या पत्रिकेत बुधाची स्थिती कमजोर असेल त्यांनी बुधवारी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. बुधाची स्थिती योग्य नसल्यास व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. चला तर जाणून घेऊया करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचे हे बुधवारचे उपाय.
ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी माता दुर्गेचे ध्यान करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. असे केल्याने जीवनात कोणतेही अडथळे येत नाही आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने त्या पाठाचे पुण्य एक लाख पठणाच्या बरोबरीचे असते, असे सांगितले जाते.
जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे किंवा कर्जाने त्रस्त असाल तर दर बुधवारी ऋणी गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हा पाठ केल्याने जीवनात हळूहळू सुख-समृद्धी येते आणि अडथळेही दूर होतात. ध्यानात ठेवा की ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण केल्यानंतर श्रीगणेशाची आरती करावी.
दर बुधवारी श्रीगणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दूर्वा अर्पण करता येते. दुर्वा अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की 21 दुर्वांची जोडी बांधली जाते आणि अशा प्रकारे गणेशाच्या डोक्यावर 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि अनेक सांसारिक मनोकामना पूर्ण होतात.
बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालेभाज्या खायला द्याव्यात. असे केल्याने 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वाद आणि ग्रह दोषांचे दुःखही दूर होते. पण लक्षात ठेवा की तुम्ही कमीत कमी तीन महिने गाईला गवत आणि हिरवे पालक खायला द्यावे, त्यानंतर तुम्हाला फळे मिळू लागतील. या गोष्टी गायीला खाऊ घातल्याने आयुष्यातील सर्व संकटे हळूहळू दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)