गणपती
Image Credit source: Social Media
मुंबई, ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे बुधवार हा गणपतीला समर्पित असतो. बुधवारी (Budhwar Upay) विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आवडता नैवद्यही अर्पण केला जातो. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशजींची पूजा केली जाते आणि त्यामुळे कार्यात यश मिळते असे म्हटले जाते. जर एखादी व्यक्तीची बऱ्याच काळापासून नोकरी आणि व्यवसायात प्रगती थांबली असेल तर बुधवारी काही उपाय केल्यास नक्कीच प्रगती होईल.
- बुधवारचे स्वरूप परिवर्तनशील आणि सौम्य मानले जाते. चल म्हणजे जंगम, जे स्थिर नाही. कन्या आणि मिथुन ही बुधाची राशी आहेत. तथापि, या दोन्ही राशी चरा राशीच्या अंतर्गत येत नाहीत. बुधवार आणि शुक्रवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्रात कोणतेही काम करू नका.
- बुधवारी श्रीगणेशाची नियमित पूजा करावी. मनोभावे केलेल्या पूजे श्रीगणेश प्रसन्न होतात. या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते. व्यवसायात आणि नोकरीत प्रगती थांबलेली असल्यास दर बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे.
- गणपतीला दुर्वा अर्पण करण्यासोबतच लाडूचा देखील नैवेद्य दाखविला जातो. लाडू त्यांना खूप प्रिय आहेत. लाडू अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात.
- याशिवाय गणेशाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्याच्या मंदिरात जाऊन दर बुधवारी 5, 7 किंवा 11 परिक्रमा करा. हे 11 बुधवार सतत करा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागतील.
- बुधवारी तृतीयपंथीयांना काही पैसे दान करा आणि नंतर त्यांच्याकडून आशीर्वाद म्हणून काही पैसे घ्या. हे पैसे देवघरात किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा.
- बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.
- या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
- बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.
- बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी. याशिवाय ‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करावा , बुध दोषापासून मुक्ती मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)