Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्येला तयार होणाऱ्या महादोषामुळे प्रगतीमध्ये येणार बाधा, करा हे सोपे उपाय

| Updated on: Apr 15, 2023 | 8:27 PM

दक्षिण भारतात शनि जयंती चैत्र अमावस्येला साजरी केली जाते. तो दिवस म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस. जर कुंडलीत शनिदोष असेल किंवा साडेसाती आणि धैय्याची स्थिती असेल तर व्यक्ती त्रस्त राहतो

Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्येला तयार होणाऱ्या महादोषामुळे प्रगतीमध्ये येणार बाधा, करा हे सोपे उपाय
अमावस्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : यावर्षी चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) गुरुवार, 20 एप्रिल रोजी आहे. वैशाख अमावस्येची तिथी धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्ही केलेल्या काही उपायांमुळे प्रगतीमध्ये बाधा बनणाऱ्या 3 महादोषापासून मुक्त होऊ शकता. यासाठी तुम्हाला काही सोपे ज्योतिषीय उपाय करावे लागतील. चैत्र अमावस्येला 2023 चे पहिले सूर्यग्रहणही होत आहे.  सर्वप्रथम चैत्र अमावस्येची महत्त्वाची तिथी जाणून घेऊया.

चैत्र अमावस्या तारीख

यावर्षी वैशाख अमावस्या 19 एप्रिल रोजी सकाळी 11:23 ते 20 एप्रिल रोजी सकाळी 09:41 पर्यंत आहे. वैशाख अमावस्या तिथी 20 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी असेल.

चैत्र अमावस्येला सूर्यग्रहण

20 एप्रिलला चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहणाची वेळ सकाळी 07:04 ते दुपारी 12:29 पर्यंत आहे. या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध नाही कारण ते छाया सूर्यग्रहण आहे. अशा स्थितीत चैत्र अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर महादोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय करू शकता.

हे सुद्धा वाचा

चैत्र अमावस्येला ‘महादोष’पासून मुक्त होण्याचे तीन सोपे उपाय

1. शनी दोष, साडेसाती आणि अडिचकीचा प्रभाव कमीकरण्यासाठी- दक्षिण भारतात शनि जयंती चैत्र अमावस्येला साजरी केली जाते. तो दिवस म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस. जर कुंडलीत शनिदोष असेल किंवा साडेसाती आणि धैय्याची स्थिती असेल तर व्यक्ती त्रस्त राहतो, कामात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अशा स्थितीत वैशाख अमावस्येला शनिदेवाची विधिवत पूजा करावी. शनि मंदिरात जाऊन काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे किंवा निळे वस्त्र अर्पण करा. शनि कवच आणि शनि चालिसाचे पठण करा. शनिदेवाचा आशीर्वाद घ्या.

2. पितृदोषासाठी उपाय: पितृदोष हा प्रमुख दोष मानला जातो, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त राहते, घराची प्रगती होत नाही, कुटुंब पुढे जात नाही. अशावेळी वैशाख अमावस्येला स्नान करून पितरांना जल अर्पण करावे. पिंड दान करा. आपल्या पूर्वजांचे ध्यान करा आणि त्यांच्यासाठी दान करा. याने पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात, त्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.

3. कालसर्प दोष उपाय: कुंडलीतील इतर सात ग्रहांसह राहू-केतूची विशेष स्थिती कालसर्प दोष निर्माण करते. यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात, यश मिळणे कठीण होते. अशा स्थितीत चैत्र अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषाचा उपाय करावा. चैत्र अमावस्येला स्नान केल्यानंतर सुवर्ण नागाची पूजा करावी नंतर ते पाण्यात वाहावे. याशिवाय शांतीसाठी भगवान शंकराची पूजा करावी. शिवाच्या कृपेने कालसर्प दोष दूर होऊ शकतो.
सर्वार्थ सिद्धी योगात उपाय करा उपाय :  चैत्र अमावस्येच्या दिवशी पहाटे 5.51 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो. या योगात केलेली कामे यशस्वी होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)