हिंदू धर्मामध्ये कालाष्टमीला खूप खास मानली जाते. हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये, कालाष्टमीचा दिवस काल भैरवाला समर्पित आहे. कालष्टमीच्या दिवशी कालभैरवची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या घटना घडतात. भगवान कालभैरव यांना महादेवचे भयंकर रूप मानले जाते. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. अनेकवेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुम्हाला हवं तसे फळ मिळत नाही. याचे कारण म्हणजे तुमच्या जीवनातील दोष. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी कालाष्टमीचा उपवास करणे फायदेशीर ठरेल.
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवची पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे तुमच्यावर असलेल्या वाईट नजर दूर करण्यास मदत करतात. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी काही विशेष पद्धतीनं पूजा करा. दर महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला कालाष्टमी येते. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 22 मार्च रोजी पहाटे 4:23 वाजता सुरू होईल आणि 23 मार्च रोजी सकाळी 5:23 वाजता संपेल. रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
अशा परिस्थितीत चैत्र महिन्यातील कालष्टमी 22 मार्च रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान कालभैरवाचे व्रत आणि पूजा केली जाईल. या दिवशी, निशा काळातील पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 12:04 वाजता सुरू होईल. हा शुभ मुहूर्त 12:51 वाजता संपेल. या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी पूजेदरम्यान, कालभैरव देवाला कपडे आणि नारळ अर्पण करा. देव कपडे आणि नारळाने खूप प्रसन्न होतो. या दिवशी पूजेदरम्यान जो कोणी देवाला कपडे आणि नारळ अर्पण करतो, तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करतो. कालभैरव देवाला कपडे आणि नारळ अर्पण केल्याने शुभ फळे मिळतात. असे केल्याने कामात यश मिळते. हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये सुपारीला खूप शुभ मानले जाते. म्हणून, कालष्टमीच्या पूजेदरम्यान, भगवान कालभैरवाला सुपारी अर्पण करावी. जो कोणी भगवान कालभैरवाला सुपारी अर्पण करतो, त्याच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
या दिवशी भगवान कालभैरवाला पानांचा नैवेद्य दाखवावा. जे असे करतात त्यांना शुभ फळे मिळतात. आणि त्यांचे सर्व दुःख दूर होते. त्याच वेळी, हिंदू धर्मात असे मानले जाते की या दिवशी भगवान कालभैरवाला काळे तीळ अर्पण केल्याने ग्रहदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रलंबित काम पूर्ण होईल. याशिवाय, गंगाजल, दूध, दही, मध, तूप, कुंकू, रोली, चंदन, फुले, धूप, दिवा, नैवेद्य, मोहरीचे तेल आणि लवंग देखील भगवान कालभैरवाला अर्पण करावेत.