देशभरात चैत्र नवरात्र (Chaitra navratri 2022) सुरू झाली आहे. देशभरात शारदीय नवरात्रीला मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. 2 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीसाठी भक्त उपवास ठेवतात आणि भक्तिभावाने पूजा करतात. माँ दुर्गेला फळे आणि फुले अर्पण केली जातात. अशा वेळी आईच्या नऊ रूपांना विशेष नैवेद्य दाखवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असेही सांगितले जाते. त्याच प्रमाणे देवीच्या आवडत्या रंगाचे कपडे (Clothes) आपण परिधान केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते रंग.
माता शैलपुत्रीला पांढरा भोग अर्पण करण्याची विशेष मान्यता आहे. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून मातेला तूप अर्पण केल्याने भक्तांना रोगांपासून मुक्ती मिळते. अशी मान्यता आहे. त्याच प्रमाणे आज तुम्ही लाल रंगाचे कपडेसुद्धा परिधान करु शकता.
ब्रह्मचारिणी मातेला बेलाचे पान अर्पण करण्याची विशेष मान्यता आहे. या दिवशी हिरवी वस्त्रे परिधान करून मातेला मिठाई किंवा साखरेचा नैवेद्य दाखवावा.
माता चंद्रघंटाला दूध आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की या वस्तूंचे दान केल्याने माता चंद्रघंटा प्रसन्न होते आणि व्यक्तीचे सर्व दुःख दूर करते. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडा यांना मालपुआ अर्पण केला जातो. या दिवशी मातेचे भक्त केशरी वस्त्र परिधान करतात .
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेला केळी अर्पण केली जातात. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून आईला प्रसन्न करु शकतात.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेला मध अर्पण केला जाते. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालण्याचीही विशेष ओळख आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीला गूळ अर्पण केला जातो. या दिवशी निळ्या रंगाचे कपडे तुम्हा परिधान करु शकता.
या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी भाविक गुलाबी वस्त्रे परिधान करून मातेला नारळ अर्पण करतात.
या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी मातेचे भक्त जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. या दिवशी देवीला वेगवेगळ्या गोष्टींचे भोग दाखवले जातात.
या मंत्रांनी देवी दुर्गेला प्रसन्न करा
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।
ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी. दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ।
किंवा देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेण संस्था, नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः । किंवा देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधीत बातम्या
Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!
Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!