मुंबई : 22 मार्चपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2023) सुरुवात होत आहे. यासोबतच रामाच्या नवरात्रीला पण सुरूवात होत आहे. यंदा चैत्र नवरात्रीत मातेचे वाहन नौका असणार आहे. नवरात्रोत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. अश्विन आणि चैत्र महिन्यातील नवरात्र सर्वात लोकप्रिय आहे. चैत्र नवरात्रीपासूनच नवीन पर्व सुरू झाले अशी धार्मिक मान्यता आहे. यावेळी चैत्र नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या काळात 23 मार्च, 27 मार्च आणि 30 मार्चला 3 सर्वार्थ सिद्धी योग होणार आहेत. तर 27 मार्च आणि 30 मार्च रोजी अमृत सिद्धी योग होणार आहे. 24, 26 आणि 29 मार्च रोजी रवि योग होणार आहे. गुरु पुष्य योग नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशीही असेल. नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते. चला जाणून घेऊया नवरात्रीच्या घटस्थापनेचे नियम आणि योग्य मुहूर्त कोणते आहेत.
यावेळी नवरात्रीची प्रतिपदा 22 मार्च रोजी येत आहे. या दिवशी कलशाची स्थापनाही केली जाईल. घटस्थापनेसाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 06.23 ते 07.32 पर्यंत असेल.
घटस्थापनेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर स्वच्छ ठिकाणी लाल रंगाचे कापड पसरून देवीची मूर्ती स्थापित करा. या कपड्यावर थोडे तांदूळ ठेवा. मातीच्या भांड्यात बार्ली पेरा. या भांड्यावर पाण्याने भरलेला कलश बसवावा. कलशावर स्वस्तिक बनवून त्यावर कलव (लाल धागा) बांधावा. कलशात आंब्याची पाने संपूर्ण सुपारी, नाणे आणि अक्षत टाका. एक नारळ घेऊन त्याला दोऱ्याने सुतवावे. हे नारळ कलशावर ठेवून दुर्गा देवीचे आवाहन करा. यानंतर दिवा लावून कलशाची पूजा करावी. नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेसाठी सोने, चांदी, तांबे, पितळ किंवा मातीच्या कलशाची स्थापना केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)