मुंबई : नवरात्रीची सुरुवात 22 मार्च, बुधवारपासून होईल आणि 30 मार्च, गुरुवारी समाप्त होईल. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करून दुर्गा मातेची पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत काही ठिकाणी देवीची जत्राही भरते. याशिवाय मराठी नव वर्षाची सुरूवात गुढी पाडवा (Gudi Padwa 2023) देखील या दिवशी साजरा होतो. नवरात्रीच्या अष्टमी व नवमीला लहान मुलींना माता दुर्गेचे रूप मानून कन्याभोजाचे आयोजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात वास्तूची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. चला जाणून घेऊया वास्तूनुसार देवीची मूर्ती आणि कलश कसे तयार करावे.
नवरात्रीच्या काळात देवीची मूर्ती किंवा कलश नेहमी ईशान्य दिशेला लावावा. या दिशेला देवतांचा वास असतो. तसेच यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत राहते. अखंड ज्योतीची स्थापना आग्नेय कोनातच करावी.
नवरात्रीच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावावे, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यासोबतच घराचा मुख्य दरवाजा आंब्याच्या पानांनी सजवावा. यामुळे घर सुंदर दिसते आणि घरात शुभता राहते.
लाकडी चौरंगावर चंदनाचा पाट ठेवावा व त्यावर देवीची मूर्ती स्थापण करावी. वास्तुशास्त्रात चंदनाला शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. यामुळे वास्तुदोष संपतात.
असे मानले जाते की कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये. नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये. काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो . काळ्या रंगाने मन सतत विचलित होते.
नवरात्रीत पिवळा आणि लाल रंग वापरावा. असे मानले जाते की पिवळा रंग जीवनात उत्साह, तेज आणि आनंद आणतो आणि लाल रंग जीवनात उत्साह आणतो. आईलाही या रंगांनी सजवावे. वास्तूनुसार या रंगांच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
नवरात्रीच्या संध्याकाळनंतर कापूर जाळून मातेची आरती करावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते.
नवरात्रीच्या काळात लिंबाचा वापर टाळावा. नवरात्रीमध्ये घरातील आंबट वस्तूंचा वापर कमी करावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि मनही अशांत राहते.
नवरात्रीमध्ये घराचे अंगण शेणाने सारवावे. हे शक्य नसेल तर घराच्या अंगणात 7 मातीची भांडी लटकवावीत. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि देवी लक्ष्मी घरात वास करेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)