Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीला केलेल्या या उपायामुळे घरात नांदेल सुख संमृद्धी, कर्जातून होईल मुक्तता

| Updated on: Mar 09, 2023 | 8:43 AM

असे मानले जाते की, नवरात्री दरम्यान, माता दुर्गा स्वतः पृथ्वीवर भ्रमण करते, म्हणून हा काळ मातेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी अतिशय योग्य आहे.

Chaitra Navratri : चैत्र नवरात्रीला केलेल्या या उपायामुळे घरात नांदेल सुख संमृद्धी, कर्जातून होईल मुक्तता
नवरात्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्री (Chaitra Navratri 2023) वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते. यापैकी 2 दृश्य नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्री आहेत. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र ही दृश्य नवरात्र असते, ज्यामध्ये माता दुर्गेची पूजा करण्याबरोबरच अनेक सजावटही केली जाते. अश्विन महिन्यातील नवरात्रीत हा सण साजरा केला जातो. ठिकठिकाणी गरबा खेळला जातो. भंडारा आणि जागरण होतात. यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्च 2023 पासून होत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांत दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाणार आहे. एवढेच नाही तर हिंदू नववर्ष  2080 हे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होणार आहे. या काळात केलेल्या काही उपायांमुळे सर्व मनोकामना पुर्ण होतात.

असे मानले जाते की, नवरात्री दरम्यान, माता दुर्गा स्वतः पृथ्वीवर भ्रमण करते, म्हणून हा काळ मातेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, तिला प्रसन्न करण्यासाठी अतिशय योग्य आहे. अशा परिस्थितीत नवरात्रीमध्ये केलेले उपाय उत्तम फळ देतात. चला जाणून घेऊया या चैत्र नवरात्रीत कोणते उपाय करावेत.

चैत्र नवरात्रीला हे उपाय अवश्य करून पहा

नवरात्रीच्या सुरुवातीला संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होईल. नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात आणि आर्थिक सुबत्ता येते.

हे सुद्धा वाचा

नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करा, परंतु दररोज मातेची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा करा. असे केल्याने प्रथम उपासक गणेश प्रसन्न होतो. ते बुद्धी आणि संपत्तीचे दाता आहेत.

वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा येण्यासाठी नवरात्रीमध्ये घटस्थापना करा. तसेच घटस्थापनापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवावे.

नवरात्रीच्या काळात घरात तुळशीचे रोप नक्कीच लावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. तुळशीच्या रोपाजवळ एक नाणे ठेवा आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा.

कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये वाहत्या पाण्यात कणकीचे दिवे वाहावे. यामुळे जीवनातील सर्व अडथळे आणि बाधा दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते.

नोकरीत प्रमोशन आणि पगारवाढ हवी असेल तर नवरात्रीच्या काळात देवीला सुपारी अर्पण करा. नोकरी-व्यवसायात वेगाने प्रगती होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)