Chaitra Purnima 2023 : आज चैत्र पोर्णिमा, किती वाजता होणार चंद्रोदय?

| Updated on: Apr 05, 2023 | 2:54 PM

आज चैत्र पौर्णिमेचे व्रत पाळण्यात येत असून दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा केला जाणार आहे. चैत्र पौर्णिमेचा चंद्रोदय अतिशय शुभ योगात होईल असे पंचांगात सांगण्यात आले आहे.

Chaitra Purnima 2023 : आज चैत्र पोर्णिमा, किती वाजता होणार चंद्रोदय?
पोर्णिमा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी येते. या दिवसाला चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima 2023) किंवा चैती पूनम असेही म्हणतात. यावर्षी चैत्र पौर्णिमा आज 05 एप्रिल रोजी सुरू झाली असून ती उद्या 06 एप्रिल रोजी संपेल. धार्मिक मान्यतेनुसार आज चैत्र पौर्णिमेचे व्रत पाळण्यात येत असून दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा केला जाणार आहे. चैत्र पौर्णिमेचा चंद्रोदय अतिशय शुभ योगात होईल असे पंचांगात सांगण्यात आले आहे. आज तीन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. असे मानले जाते की या काळात पूजा केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. चैत्र पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या शुभ मुहूर्ताचा कालावधी, पूजेची वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.

चैत्र पौर्णिमा शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 05 एप्रिल रोजी सकाळी 09.19 वाजता सुरू होईल आणि 06 एप्रिल रोजी सकाळी 10.04 वाजता समाप्त होईल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 06:01 आहे आणि त्याच वेळी चंद्र देवाचीही पूजा केली जाईल.

चैत्र पौर्णिमा शुभ योग

पंचांगात असे सांगितले आहे की चैत्र पौर्णिमा किंवा चैती पूनमच्या दिवशी अत्यंत शुभ योग – ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग तयार होत आहेत. पौर्णिमेच्या दिवशी ध्रुव योगाची निर्मिती अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानली जाते. या काळात देवतांची पूजा आणि कोणतेही शुभ कार्य केल्यास शुभ फळ मिळते. यासह आज संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार असून या शुभ मुहूर्तावर उपासना केल्याने साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

हे सुद्धा वाचा

चैत्र पौर्णिमा पूजा पद विधी

चैत्र पौर्णिमेच्या शुभ दिवशी स्नान आणि ध्यान करून भगवान सत्यनारायण कथा पाठ करा आणि रात्री चंद्रदेवाची पूजा करा. यासोबतच मध्यरात्री देवी अष्टलक्ष्मीची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 06 एप्रिल रोजी सकाळी पवित्र स्नान करून दान करावे. या विशेष दिवशी सुंदरकांड पठणही खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील साजरा केला जाईल, म्हणून हनुमानजीची पूजा करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)