मुंबई : चाणक्य नीतीला ज्ञानाचा सागर म्हणतात. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक रहस्ये उलगडली आहेत. चाणक्य नीती हे देखील स्पष्ट करते की एखादी व्यक्ती जीवनातील संघर्ष कसे कमी करू शकते. आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) हे केवळ राजकारण, कुटनीती आणि युद्धशास्त्रात पारंगत नव्हते, तर त्यांना जीवनातील इतर महत्त्वाच्या विषयांचे सखोल ज्ञान होते. त्यांनी त्यांच्या धोरणांद्वारे ज्याला आपण चाणाक्य नीती म्हणून ओळखतो त्याद्वारे असंख्य तरुणांना मार्गदर्शन केले होते आणि आजही त्यांची धोरणे यशाची गुरुकिल्ली म्हणून वाचली जातात. आचार्यजींनी चाणक्य नीतीमध्ये देखील सांगितले होते की, व्यक्तीने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि पाळल्या पाहिजेत. तसेच माणसाचे यश कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते तेही त्यांनी आपल्या धोरणांमध्ये सांगितले आहे. जीवनात यशस्वी होणाची इच्छा असणाऱ्या प्रत्त्येकाला हे उपयुक्त ठरेल.
त्यजेद्धर्म दयाहीनं विद्याहीनं गुरुं त्यजेत् ।
त्यजेत्क्रोधमुखी भार्या निःस्नेहान्बान्धवांस्यजेत् ।।
कोणत्याही धर्मात करुणेची भावना नसेल तर तो लवकरात लवकर सोडला पाहिजे. यासोबतच अशिक्षित शिक्षक, संतप्त आणि द्वेश भावाने भरलेल्या नातेवाईकांचाही त्याग केला पाहिजे. कारण करुणा नसेल तर विनाश निश्चित होतो. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये प्रेम नसेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गरजेच्या वेळी किंवा कठीण प्रसंगात फक्त कुटुंबच आपल्याला साथ देते हे दिसून येते. पण प्रेम नसलेल्या नातेवाइकांकडून मदतीची अपेक्षा ठेवणे तर सोडाच, साधा धीरही मिळत नाही.
यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निर्घषणच्छेदन तापताडनैः ।
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते त्यागेन शीलेन गुणेन कर्मणा ।।
ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा चार गोष्टींनी केली जाते: घर्षण, कापणे, तापणे करणे आणि हातोड्याचे प्राहार सहन करणे. त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याच्या त्याग, नम्रता, गुण आणि कृती यावर होते. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगत आहेत की, ज्याप्रमाणे खऱ्या सोन्याला त्याची सत्यता मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे महान व्यक्ती त्यांच्या स्वभावातून आणि त्यागाच्या भावनेने ओळखली जाते आणि त्याची वेळोवेळी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात गोडवा आणि दयाळूपणा असणे अत्यंत आवश्यक आहे.