मुंबई : आचार्य चाणक्यांची निती (Chanakya Neeti) माणसाला प्रत्येक पावलावर साथ देतात आणि वाईट काळातून बाहेर पडण्यास मदत करतात. शेकडो वर्षांनंतरही आचार्य चाणक्याची शिकवण लोकांना जीवनात मार्गदर्शन करत आहे. आचार्य चाणक्य यांचे हे 4 श्लोक जर तुम्हीही तुमच्या जीवनात अवलंबवले तर तुम्हीही एक सज्जन आणि श्रेष्ठ व्यक्ती ओळखू शकाल. जाणून घेऊया आचार्य चाणक्याचे हे 4 मुख्य श्लोक.
आचार्य चाणक्य यांच्या मते, वाईट आणि नकारात्मक बोलण्याने संपूर्ण कुटुंब नष्ट होते. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कठोर शब्द बोलणारा वंश कलंकित करतो तर गोड बोलणे उच्च कुळातील असल्याचा दाखला देतो. तोंडातून वाणी बाहेर पडताच तो कोणत्या कुळात जन्मला हे कुळाचे मोठेपण प्रथम कळते. म्हणूनच माणसाने आपल्या कुळाच्या अभिमानासाठी चांगली आणि गोड भाषा वापरली पाहिजे.
आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात पुढे म्हटले आहे की, पुत्रप्राप्तीपेक्षा मोठे दुसरे सुख नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते पुत्रप्राप्ती हे सांसारिक सुखांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. बहुधा या सृष्टीची परंपरा पुढे नेण्यासाठीच निर्मात्याने आईवडिलांच्या मनात पुत्राची ओढ निर्माण केली असावी.
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याने दररोज सकाळी दिवसभरातील कामांचा विचार केला पाहिजे. माणसाला सकाळी उठल्यावर दिवसभर काय कार्यक्रम आहे याचा विचार करायला हवा. याचा विचार केल्याने कामांबाबतची कोंडी संपते आणि त्याचा संपूर्ण दिवस ठरलेल्या वेळापत्रकानुसार जातो.
या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी वादाच्या वेळी धर्मानुसार वागावे असे सांगितले आहे. चाणक्य म्हणतो की, परस्पर भांडण किंवा कलहाच्या वेळी धर्माची काळजी घेतली पाहिजे. धर्म विसरता कामा नये. जो माणूस भांडणाच्या वेळीही धर्माचे स्मरण करतो, तो महापाप करण्यापासून वाचतो, कारण भांडणाच्या वेळी माणूस रागाच्या भरात काहीही करू शकतो, त्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)