मुंबई, आचार्य चाणक्य यांची नीती (Chanakya Niti) आजच्या काळात देखील महत्त्वपूर्ण सिद्ध होते. प्राचीन काळात त्यांनी दिलेले उपदेश हे माणसाला अनेक समस्येपासून वाचवू शकतात. ‘चाणक्य-नीती शास्त्र’च्या पहिल्या अध्यायात सांगितले आहे की, कुणावरही डोळेझाकपणे विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे. आचार्य विष्णुगुप्त चाणक्य (Vishnugupt chanakya) यांच्या ‘चाणक्य-नीती शास्त्रा’मध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. आचार्य चाणक्य हे त्यांच्या गुणांनी राजकीय विद्वान, नीतिशास्त्राचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेले साहित्य हे समाजात शांतता, न्याय आणि प्रगती शिकवणारे ज्ञानाचे भांडार आहे. हजारो वर्षांपूर्वी, आचार्य चाणक्यांनी चाणक्य-नीती शास्त्र लिहिले, ज्यात लिहिलेले तर्क आजच्या काळातही अगदी तंतोतंत सिद्ध होतात.
अश्विनी पाराशर यांच्या ‘चाणक्य नीती’ या पुस्तकानुसार चाणक्य-नीती शास्त्राच्या पहिल्या अध्यायात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
आचार्य चाणक्य यांनी विश्वासार्हतेच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करताना म्हटले आहे की, “काही लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये कारण त्यांच्या कृतीचा कधीच भरवसा नसतो. तसेच यांच्यावर चुकून विश्वास ठेवला तर फसगत होण्याची शक्यता अधिक असते.
“नखिनम् च नदीनाम च श्रृंगीणम् शास्त्रपाणिनम्। विश्वासणारे भोळे कर्तव्य: स्त्रीशु राजकुलेषु च 15॥”
सिंह, अस्वल, वाघ किंवा इतर लांब नखं असलेल्या शिकारी प्राण्यांपासून सावध राहावे. यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून कुठलीच कृती करू नये. भावनेच्या भरात विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे होय.
आचार्य चाणक्य म्हणतात की ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत, त्यांच्यावरही अंधविश्वास ठेवू नये. असे लोकं स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याचे नुकसान करू शकतात. तसेच शस्त्र असलेल्या लोकांशी कधी भांडणही करू नये. रागाच्या भरात ते टोकाचे पाऊलं उचलू शकतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, राजकारणी लोकं स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही ठरला जाऊ शकतात. सत्ता मिळविणे आणि ती टिकविणे यासाठी ते कुठलाही टोकाचा निर्णय घेऊ शकतात.
एखाद्याचा विश्वासघात करायला देखील ते मागेपुढे पाहत नाही. सत्तेच्या लोभापोटी कंसाने आपले वडील उग्रसेनलादेखील तुरुंगात टाकले. देवकीचा सातवा पुत्र कंसाचा जीव घेणार असल्याचे भविष्य कळल्यावर बहीण देवकीला तिचा पती वासुदेव यांच्यासह तुरुंगात टाकले होते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्हाला नदी ओलांडायची असेल तर नदीचा प्रवाह किंवा खोली किती आहे हे सांगण्यासाठी तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, कारण नदीचा प्रवाह आणि खोली याविषयी कोणीही अचूक माहिती देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत स्वतःचा विवेक वापरला पाहिजे.