मुंबई : चाणक्य, ज्यांना जीवन प्रशिक्षक म्हटले जाते, त्यांनी आपल्या धोरणांमध्ये एखाद्या व्यक्तीचे वागणे त्याला जीवनात आनंद आणि समृद्धीचे वातावरण कसे देऊ शकते हे त्यांनी सांगितले. आचार्य चाणक्य यांनीही अशा लोकांबद्दल सांगितले आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले होते की, लोकांना असे वाटते की जीवनाचे ध्येय फक्त पैसा (Chanakya Niti ) आचार्य चाणक्यांनी सांगितेल्या या गोष्टी आत्मसात करा, अपयश आणि नुकसान चार हात लाबंच राहील मिळवणे आहे. आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आत्मसात केल्याने अपयश आणि नुकसान चार हात लाबंच राहील अशी त्यांची मान्यता होतीय चाला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
वेळेचे महत्त्व
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. या लोकांवर अनेक संकटे येतात. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. करिअर आणि स्थिर जीवनासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.
राग
आचार्य चाणक्य यांच्या मते क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर अपयशही अशा लोकांना त्रास देते.
वायफळ खर्च
चाणक्याच्या मते, आपण सर्वांनी आपल्या उत्पन्नानुसार खर्च केला पाहिजे. अनेकदा लोक त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू लागतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना एकवेळ आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुमची सेव्हिंग तुमची सर्वात मोठा मित्र बनू शकतो.
पैश्यांचा अपव्यय
चाणक्य नीतीनुसार धनाची देवी लक्ष्मी चंचल स्वभावाच्या आहेत. ते कधीही एकाच ठिकाणी राहत नाहीत. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने पैसा मिळाला असेल तर तो पैसा वाया जाऊ नये.
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti | आयुष्यामध्ये ‘या’ गोष्टी कधीही करू नका, माता लक्ष्मी नेहमीच प्रसन्न राहिल!